विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 2, 2016 02:17 IST2016-07-02T02:17:53+5:302016-07-02T02:17:53+5:30

लग्नामध्ये हुंड्यात सोन्याची चेन व पैसे दिले नाहीत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ.

Married to Marriage; Filed the complaint | विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

आकोट (जि. अकोला): लग्नामध्ये हुंड्यात सोन्याची चेन व पैसे दिले नाहीत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकोट येथील माहेर असलेल्या शीतल सुमित कुबडे या विवाहितेने तिचा पती सुमित अरुण कुबडे, अरुण भाऊराव कुबडे, पुष्पा अरुण कुबडे, सारिका प्रमोद राऊत सर्व रा. अंबरनाथ मुंबई यांनी लग्नामध्ये सोन्याची चेन व नगदी १ लाख व इतर वस्तू दिल्या नाहीत असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच शारीरिक व मानसिक त्रास देऊन जिवे मारण्याची धमकी दिली व वीट मारून जखमी केले. अशा आशयाची फिर्याद आकोट शहर पो.स्टे.ला दिली. त्यावरून आकोट शहर पोलिसांनी उपरोक्त चारही आरोपींविरुद्ध भादंविच्या ४९८ अ, ३२३, ५0४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ अंबरनाथ असल्यामुळे पुढील तपासार्थ प्रकरण शिवाजी नगर पोलीस ठाणे मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे.

Web Title: Married to Marriage; Filed the complaint