एक विवाह ऐसा भी..!

By Admin | Updated: April 18, 2015 01:51 IST2015-04-18T01:51:46+5:302015-04-18T01:51:46+5:30

भागवत कथेदरम्यान कृष्ण विवाहाऐवजी लावले गरीब जोडप्याचे लग्न.

A marriage too ..! | एक विवाह ऐसा भी..!

एक विवाह ऐसा भी..!

अकोला: विवाह हा एक संस्कार आहे. प्रत्येक मुला-मुलीला आपला विवाह थाटामाटात व्हावा, असे वाटते. आई-वडीलही आपल्या मुला-मुलीचे थाटामाटात लग्न करण्याचे स्वप्न बघतात; परंतु गरिबी, आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. समाजाची मदत मिळाली तर त्यांचे स्वप्न साकार होऊ शकतं. विनोद मापारी मित्र मंडळाने भागवत कथा सप्ताह सोहळय़ामध्ये गरीब कुटुंबातील मुला-मुलीचे थाटात आणि वाजतगाजत लग्न लावून एक आदर्श समाजासमोर ठेवला. शिवापूर येथील गजानन कोगदे यांची मुलगी राधा हिचा विवाह वांगरगाव येथील अर्जुन जुमळे यांचा मुलगा प्रदीप यांच्याशी जुळला. दोन्ही कुटुंबाची परिस्थिती जेमतेम. थाटामाटात लग्न करण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती आडवी येत होती. साखरपुड्याला गेलेले उपमहापौर विनोद मापारी व त्यांच्या मित्र मंडळींनी दोन्ही कुटुंबाची इच्छा हेरली आणि उपवर मुला-मुलीचे थाटात लग्न लावून देण्याची तयारी दाखवली. दोन्ही कुटुंब क्षणात तयार झाले आणि विवाहाचे योग जुळून आले. लग्नाचा दिवस ठरला. रिंग रोडवरील श्रीरामकृष्णनगरातील मैदानावर सुरू असलेल्या बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांच्या भागवत कथा सप्ताह सोहळय़ामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांच्या स्वरांमध्ये राधा व प्रदीपचा विवाह करण्याचे ठरले. आयोजन समितीने वाद्ये, अश्‍व आणि डोलीची व्यवस्था केली. नटलेली नववर अश्‍वावर स्वार होऊन तर नववधू फुलांनी सजलेल्या डोलीमध्ये बसून विवाह मंडपात आली. भाविकांनी पुष्पवर्षाव करून वधू-वरांचे स्वागत केले. सुमधुर मंगलाष्टकांच्या सुरात, फटाक्यांच्या आतषबाजीत वधू-वरांचे लग्न लावण्यात आले. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर उज्ज्वला देशमुख, सुमन गावंडे, नगरसेवक विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, भाजप शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे पाटील, नगरसेवक आशिष पवित्रकार, राजेश मिश्रा, पंकज जायले, प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी वाढोकार, पोलीस निरीक्षक बुधवंत उपस्थित होते.

Web Title: A marriage too ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.