विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: April 8, 2017 00:39 IST2017-04-08T00:39:40+5:302017-04-08T00:39:40+5:30
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील सस्ती शिवारात २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.

विवाहितेची आत्महत्या
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील सस्ती शिवारात २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.
माहेरात आलेल्या उज्ज्वला नीलेश मोरखेडे रा. शेगाव यांनी ६ एप्रिल रोजी रात्री गावाच्या बाजूलाच असलेल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी नागरिकांना उज्ज्वला यांचे प्रेत लटकलेले आढळल्याने ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटील अरुण बदरखे यांनी घटनेची माहिती चान्नी पोलिसांना दिली. चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात हे.काँ. बालाजी सानप, गोपाल धुर्वे, मनीष कुलट, चंद्रकांत नागपुरे आदींनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. महिलेचे प्रेत चार फुटांवरच लटकलेले असल्याने आत्महत्या की हत्या, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. उज्ज्वला या सस्ती येथील कैलास निरंजन बुरंगे यांची कन्या आहेत. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.