विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 03:52 IST2017-06-09T03:52:38+5:302017-06-09T03:52:38+5:30

पतीसह कुटुंबातील पाच जणांविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.

Marriage of persecution; 5 accused filed against husband! | विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्याकडील रोख व सोन्याचे दागिने काढून घेणाऱ्या पतीसह कुटुंबातील पाच जणांविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.
बोरगाव मंजू येथे वडिलांकडे राहणारी नेहा अंजुम शेख रहीम (२३) हिने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे तीन वर्षांपूर्वी मुंबईतील खारघर येथील शेख रहीम याच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर काही महिन्यातच पतीने तिचा छळ सुरू केला. त्यामुळे ती माहेरी परत आली.
या ठिकाणी येऊन पतीने तिला मारहाण केली आणि तिच्याकडील रोख २0 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने काढून घेतले. नेहा अंजुम हिचा पती शेख रहीम याच्यासह सासू मरियमबी शेख ईस्माईल, नणंद राणी, नाजी आणि जेठ करीम, नणंदचा मुलगा आशू हेसुद्धा छळ करीत होते. नेहाच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी भादंवि कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Marriage of persecution; 5 accused filed against husband!