११ लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ
By Admin | Updated: June 15, 2014 01:34 IST2014-06-14T23:35:03+5:302014-06-15T01:34:18+5:30
माहेरावरून ११ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ होत असल्याने

११ लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ
अकोला : माहेरावरून ११ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ होत असल्याने शनिवारी रात्री खदान पोलिसाांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला.
मंगरूळपीर रोडवरील सिंधी खदान येथे राहणारी निलोफर खानम सैय्यद अशरफ अली (२२) हिने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती सैय्यद अशरफ अली (२७), सासरा अफसर अली, सासू व नणंद सर्व रा. भायखळा मुंबई यांच्याकडून माहेराहून ११ लाख रुपये आणण्यासाठी लग्न झाल्यापासून सातत्याने तगादा लावण्यात येत होता; परंतु आपण पैसे आणत नसल्याचे पाहून आरोपींनी आपला शारीरिक व मानसिक छळ करण्यास प्रारंभ केला. एवढेच नाही तर तलाक देण्याची धमकी दिली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली होती; परंतु पोलिसांनी व महिला तक्रार निवारण कक्षाने तक्रारीची दखल न घेतल्याने, निलोफर खानम हिने न्यायालयाकडे तक्रार केली. न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री खदान पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला.