बाजार समितीत व्यापा-यांकडून ‘रिंगण’ करून शेतमालाची खरेदी!
By Admin | Updated: March 24, 2015 00:34 IST2015-03-24T00:34:58+5:302015-03-24T00:34:58+5:30
व्यापा-यांकडून शेतक-यांची संगनमताने लुबाडणूक, शेतक-यांची प्रशासकाकडे तक्रार.
_ns.jpg)
बाजार समितीत व्यापा-यांकडून ‘रिंगण’ करून शेतमालाची खरेदी!
अकोला- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणार्या शेतमालाची खरेदी करण्यासाठी व्यापारी ह्यरिंगणह्ण करून शेतकर्यांची संगनमताने लुबाडणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. शेतकर्यांनी याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाकडे शुक्रवारी तक्रार केली असून, अडत्या मंडळाच्या पदाधिकार्यांनीही दोषी व्यापार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. शासनाने शेतमालाचे हमी दर ठरवून दिले असले तरी आजही शेतकर्यांना त्यांचा माल विकताना व्यापार्यांच्या मर्जीवरच अवलंबून राहावे लागते. व्यापार्यांकडून वाटेल त्या प्रमाणे दर आकारून शेतमालाची खरेदी केली जाते. याबाबत यापूर्वी अनेकवेळा तक्रारी होऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. शुक्रवार, २0 मार्च रोजी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर चक्क व्यापार्यांनी संगनमताने शेतकर्यांचे सोयाबीनचे दर पाडून खरेदी करण्याचा प्रकार घडला. आकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील शेतकरी तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गजानन पुंडकर आणि अकोला तालुक्यातील खरप खुर्द येथील शेतकरी संतोष गोंडचवर यांनी त्यांचे सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणले होते. श्रीयोगीराज ट्रेडर्समध्ये त्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ठेवले होते. यावेळी काही व्यापार्यांनी रिंगण करून शेतमाल खरेदीचा प्रकार घडला. या दोन्ही शेतकर्यांच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २९00 रुपयांपासून बोली लावण्यास सुरुवात केली आणि ३0२५ रुपयांवर बोली थांबविली. विशेष म्हणजे त्याचवेळी अन्य अडत्यांकडे त्याच प्रकाराच्या सोयाबीनला ३२३0 रुपयांपर्यंत दर देण्यात आले होते. याबाबत शेतकर्यांनी व्यापार्यांकडे विचारणा केली असता व्यापार्यांकडून शेतकर्यांची टिंगलटवाळी करण्यात आल्याचे पुंडकर आणि गोंडचवर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संगनमत करून शेतकर्यांची लुबाडणूक करणार्या खरेदीदारांवर कारवाई करण्याची मागणीही शेतकर्यांनी केली आहे.