विवाहितेचा छळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:55 IST2021-01-08T04:55:24+5:302021-01-08T04:55:24+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील कवठळ येथील रहिवासी असलेल्या गणेश महादेव आमाद्रे यांच्याशी मूर्तिजापूर तालुक्यातील ...

Marital harassment; Charges filed against six people | विवाहितेचा छळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील कवठळ येथील रहिवासी असलेल्या गणेश महादेव आमाद्रे यांच्याशी मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथील रेखा नामक युवतीसोबत विवाह झाला होता. विवाहाच्या काही दिवसांतच रेखाला सासरकडील गणेश महादेव आमाद्रे, महादेव आमाद्रे, पुष्पा महादेव आमाद्रे, प्रेमकुमार महादेव आमाद्रे, अनुराधा ज्ञानदेव इंगळे, ज्ञानदेव तुकाराम इंगळे हे मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास देत असून, माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. या सर्व बाबींना कंटाळून रेखा गणेश आमाद्रे हिने ४ जानेवारी रोजी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी कलम ४९८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील नवलाखे करीत आहेत.

Web Title: Marital harassment; Charges filed against six people