विवाहितेचा जळाल्याने मृत्यू
By Admin | Updated: February 13, 2017 16:42 IST2017-02-13T16:42:24+5:302017-02-13T16:42:24+5:30
भुसावळमधील कंडारी येथील रंजना शामराव रामटेके ( ४७) यांचा जळालेला मृतदेह घराच्या गच्चीवर आढळल्याने खळबळ उडाली आहे

विवाहितेचा जळाल्याने मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि.13- तालुक्यातील कंडारी येथील रंजना शामराव रामटेके ( ४७) यांचा जळालेला मृतदेह घराच्या गच्चीवर आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी ही घटना उघडकीस आली. रामटेके यांनी स्वत: जाळून घेतले की अन्य दुसऱ्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला याबाबत शहर पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रामटेके या गोदावरी रुग्णालयात नर्स होत्या. कंडारी येथील महाजनवाड्यातील काशीनाथ जयराम महाजन यांच्या घरात त्या भाड्याने राहत होत्या. शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक सारीका खैरनार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.