शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उतरलं पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:25 IST

मनोज जरांगे पाटलांनी कुणालाही राजकीय पाठिंबा न देता येणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar (Marathi News) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकीय मैदानात उतरलं पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. "जरांगे पाटलांचा गरीब मराठ्यांच्या रस्त्यावरचा आवाज येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेतही गेला पाहिजे. कायदेशीर लढा उभा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भूमिका घेतली पाहिजे," असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

"गेल्या ३५ वर्षांपासून गरीब मराठ्यांचा लढा हा सुरू आहे. मात्र श्रीमंत मराठे हा लढा उभा राहू देत नव्हते. परंतु जरांगे पाटलांच्या निमित्ताने त्याला स्वरूप आणि आकार मिळाला. जरांगे पाटलांनी कुणालाही राजकीय पाठिंबा न देता येणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी. जरांगे पाटलांच्या पाठीशी गरीब मराठ्यांनी पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. मुंबई येथे जे आंदोलन होणार आहे तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे," अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

सरकारवर हल्लाबोल करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत आमदार बच्चू कडू यांच्याकडून जरांगे पाटलांसोबत सुरू असलेली बोलणी अयशस्वी झाल्याची आमची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिले आहे. त्यामुळे श्रीमंत मराठे हादरले आहेत. शासनावरही दबाव टाकला जात असल्याची परिस्थिती आहे. मात्र सरकारकडून जरांगे पाटील यांना खेळवत ठेवलं जात आहे. लोकसभा निवडणुका आल्याने सरकारचा हात दगडाखाली आहे," असं ते म्हणाले. 

"ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे वेगळं असावं ही आमची भूमिका आहे. मराठ्यांसाठी आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण केलं पाहिजे," अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या आवाहनाला आता मनोज जरांगे पाटील कशा प्रकारे प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण