शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 17:53 IST

अकोला: आरक्षणासह मराठ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिल्हाबंदीचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला.

ठळक मुद्देअकोलेकरांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत बाजारपेठ, दुकाने, शाळा, महाविद्यालयांसह खासगी वाहतूक व्यवस्था बंद ठेवली होती. बंद दरम्यान शहरात कोठेही दगडफेक तसेच बळजबरी करण्यात आली नसल्याचे दिसून आले. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

अकोला: आरक्षणासह मराठ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिल्हाबंदीचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवारी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला अकोलेकरांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत बाजारपेठ, दुकाने, शाळा, महाविद्यालयांसह खासगी वाहतूक व्यवस्था बंद ठेवली होती. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला.मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने राज्यभरात उग्र रूप धारण केले आहे. सोमवारी गोदावरीत काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी संपूर्ण जिल्हाभरात बंदची हाक दिली. आंदोलनादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता शहरात बाइक रॅली काढून अकोलेकरांना बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. आंदोलकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अक ोलेकरांनी बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी शहरातील संपूर्ण बाजारपेठ, दुकाने, शाळा, महाविद्यालये यासह खासगी वाहने, आॅटोरिक्षा चालकांनी सेवा बंद ठेवणे पसंत केले. बंद दरम्यान शहरात कोठेही दगडफेक तसेच बळजबरी करण्यात आली नसल्याचे दिसून आले. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात कोठेही फिरकू न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

असा घडला दिनक्रम!* सकाळी ९ वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक जमले.* सकाळी १० वा. शहरात बाइक रॅली.* सकाळी ११.३० ला कोपर्डी घटनेतील पीडित व जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली.* सकाळी ११.५० वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, सरकारविरोधी घोषणाबाजी.* दुपारी १ वाजता जुने शहरात बाइक रॅली, दुकाने बंद करण्याची विनंती.* दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांवर जिल्हाबंदीचा ठराव घेऊन राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप.

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAkolaअकोलाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद