मांजाचा फास, दोन जण जखमी

By Admin | Updated: January 17, 2015 01:36 IST2015-01-17T01:25:03+5:302015-01-17T01:36:05+5:30

संक्रांतीनिमित्त उडविण्यात येणा-या पतंगांच्या मांजामुळे दोघे जखमी.

Manza's hangman, two injured and injured | मांजाचा फास, दोन जण जखमी

मांजाचा फास, दोन जण जखमी

अकोला : संक्रांतीनिमित्त उडविण्यात येणार्‍या पतंगांच्या मांजामुळे जखमी होणार्‍यांच्या संख्येत वाढ होत असून, शहरात १६ जानेवारी रोजी सायंकाळी दुचाकीस्वारासह दोघे जण जखमी झाले. संक्रांतीनिमित्त राज्यात मोठय़ा हर्षोल्हासात पतंग उडविल्या जातात. याकरिता चायनीज व नायलॉनचा मांजा वापरला जातो. मांजामुळे दरवर्षी अनेकांचा मृत्यू झाल्याच्या तसेच जखमी होण्याच्या घटना दरवर्षीच घडतात. यावर्षीही मांजामुळे जखमी झालेल्यांची संख्या दररोज वाढत आहे. गुरुवारी एका पक्ष्याला मांजामुळे इजा झाली. शुक्रवारी सायंकाळी कानशिवणी येथील शेतकरी पंकज अशोक बोदडे व अमोल शेरेकर हे एमएच २८ एटी ६0६२ क्रमांकांच्या दुचाकीने शहरातील शासकीय दूध डेअरीसमोरून जात होते. यादरम्यान मांजामुळे पंकज बोदडे यांच्या चेहर्‍याला इजा झाली व दुचाकीवरील दोघेही खाली पडले. त्यानंतर पंकज बोदडे यांना सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या चेहर्‍यावर गंभीर इजा झाली असून, पाच टाके पडले. चेहर्‍यावर अगदी थोड्या अंतराने डोळ्यांच्या बाजूने इजा झाली. रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी सवरेपचार रुग्णालयात दाखल आणखी एका मुलाच्या बोटांना पतंगीच्या मांजामुळे इजा झाली होती. बलोदे ले-आउटमध्ये अवस्थी आपल्या दुचाकीवर जात असताना दोन इमारतींच्या मध्ये रस्त्यावर असलेल्या मांजामध्ये ते अडकले. त्यांनी दुचाकी थांबवून हाताने मांजा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या हाताला इजा झाली. शहरातील काही भागात अशा आणखी अनेक घटना घडल्याचे समजते.

Web Title: Manza's hangman, two injured and injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.