इदगाह मैदानाच्या सुविधेसाठी मनपावर मूक मोर्चा

By Admin | Updated: June 15, 2017 01:10 IST2017-06-15T01:10:28+5:302017-06-15T01:10:28+5:30

मुस्लीम बांधवांनी दिले महापौर विजय अग्रवाल यांना निवेदन

Manpaw silent march for the convenience of Idgah ground | इदगाह मैदानाच्या सुविधेसाठी मनपावर मूक मोर्चा

इदगाह मैदानाच्या सुविधेसाठी मनपावर मूक मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मुस्लीम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान महिन्यात ईद साजरी केली जाईल. जुने शहरातील हरिहरपेठ भागात इदगाह मैदानावर कोणत्याही सोयी सुविधा नसून, याठिकाणी मद्यपी व जुगारींचे अड्डे निर्माण झाले आहेत. मनपा प्रशासनाने इदगाह मैदानावर तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करीत मनपा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांच्या नेतृत्वात असंख्य मुस्लीम बांधवांनी महापालिकेवर मूक मोर्चा काढून महापौर विजय अग्रवाल यांना निवेदन सादर केले.
रमजान महिन्यात ईदच्या दिवशी नमाज पठण करण्यासाठी शहरातील मुस्लीम बांधव हरिहरपेठस्थित मोर्णा नदीच्या काठावरील इदगाह मैदानावर एकत्र येतात. जून महिन्याच्या अखेरीस सर्वत्र ईद साजरी केली जाईल. हरिहरपेठ भागातील पुरातन व प्राचीन असलेल्या इदगाह मैदानाच्या देखभाल दुरुस्तीकडे मनपा प्रशासनाचे दुुर्लक्ष होत आहे. मैदानाला आवारभिंत किंवा तारेचे कुंपण नसल्यामुळे परिसरात मद्यपी आणि जुगार खेळणाऱ्यांची गर्दी दिसून येते. तसेच मैदानावर मोकाट कुत्रे, डुकरांचा मुक्त संचार असून, सर्वत्र घाण पसरल्याचे चित्र आहे. इदगाहच्या जागेवर मुस्लीम बांधव नमाज पठण करीत असल्यामुळे याठिकाणी महापालिकेने तातडीने मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करीत मनपा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांच्या नेतृत्वात असंख्य मुस्लीम बांधवांनी बुधवारी मनपावर धडक दिली. खुले नाट्यगृह ते महापालिका कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर विजय अग्रवाल यांना निवेदन सादर करण्यात आले. मूक मोर्चामध्ये मुफ्ती बरार हाजी अ.रशीद, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, माजी नगरसेवक नाजीमोद्दीन खतीब, नगरसेवक अ‍ॅड. इकबाल सिद्दीकी, फिरोज खान, मोहम्मद इरफान, अब्दुल रहिम पेंटर, नकीर खान, मुफ्ती गुफरान, मोईन खान, मौलाना गुलाम मुस्तफा, झोन सभापती मोहम्मद नौशाद, आरीफुर्रहेमान खान, खान सरदार खान, डॉ. उमर काळे, हमीद हुसेन, मौलाना हाफीज खलील, हाजी इब्राहिम टाटा, हाफीज अफरोज, रवी शिंदे, कपिल रावदेव, मो. इरफान कुरेशी नईम फराज, जावेद तेली, राजीक कुरेशी, शहजाद अन्वर, महेमूद उस्मान, जमील आझाद, याकुब पहेलवान, सय्यद शहजाद, मंजूर अहमद, शेख हारून, इमरान शहा, इमरान खान, महेमूद खान पठाण आदींसह असंख्य मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

Web Title: Manpaw silent march for the convenience of Idgah ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.