सैनिक फेडरेशन अध्यक्षपदी मनोज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:24 IST2021-08-19T04:24:21+5:302021-08-19T04:24:21+5:30

------------------ विद्यांचल शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात अकोट : स्थानिक विद्यांचल शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लक्ष्मीनारायण भूतडा फाउंडेशन ...

Manoj Patil as the President of Sainik Federation | सैनिक फेडरेशन अध्यक्षपदी मनोज पाटील

सैनिक फेडरेशन अध्यक्षपदी मनोज पाटील

------------------

विद्यांचल शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

अकोट : स्थानिक विद्यांचल शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लक्ष्मीनारायण भूतडा फाउंडेशन फॉर एजुकेशन संस्थेचे अध्यक्ष नरेश भुतडा, संचालक दिनेश भुतडा, सचिव सारिका भुतडा, सदस्य राजेश भुतडा, संदीप बूब, नीलेश राठी, सुरेश भुतडा, शाळेच्या प्राचार्या डॉ. शैलजा त्रिवेदी, प्रशासकीय संचालक प्रशांत विनायक उपस्थित होते.

कार्यक्रमात संगीत विभागातर्फे श्रद्धा वानखडे, रोहित दापुरे, विजय शेजव यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर शाळेचे नृत्य शिक्षक विनायक दाते व साईप्रसाद दाते यांनी सैनिकांच्या जीवनावर आधारित नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख योगेश जोंधळे, नीलिमा इंगळे व मनोज शर्मा यांनी परिश्रम घेतले.

------------------

शिवाजी महाविद्यालय येथे वृक्षारोपण

अकोट : स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. ए.एल. कुलट यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय सेवा योजना रोटरी क्लब, शेतकरी मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात नंदकिशोर शेगोकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मिशन ऑक्सिजन अंतर्गत ५० झाडे लावण्यात आली. यावेळी प्रा. गजानन तायडे , प्रा. भरत नागरे, प्रा. पवन ठाकरे तसेच अकोट रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय बोराेडे, सचिव अनंतराव काळे उपस्थित होते.

-----------------------

Web Title: Manoj Patil as the President of Sainik Federation