मनोज धुमने हत्याकांडातील सातवा आरोपी गजाआड

By Admin | Updated: August 13, 2015 01:24 IST2015-08-13T01:22:53+5:302015-08-13T01:24:22+5:30

मनोज धुमने हत्याकांड व जय वाडेकर यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील सातव्या आरोपीस अटक.

Manoj Dhum, the seventh accused in the murder case, Gajaad | मनोज धुमने हत्याकांडातील सातवा आरोपी गजाआड

मनोज धुमने हत्याकांडातील सातवा आरोपी गजाआड

अकोला - गुलजारपुरा येथील मनोज धुमने हत्याकांड व जय वाडेकर यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील सातव्या आरोपीस डाबकी रोड पोलिसांनी मंगळवारी रात्री जुने शहरातून अटक केली. शेख साजीद ऊर्फ बबलू शेख बिस्मिल्ला असे आरोपीचे नाव असून, रात्री १0 वाजताच्या सुमारास त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने यापूर्वी सहा आरोपींना अटक केली आहे

Web Title: Manoj Dhum, the seventh accused in the murder case, Gajaad