समस्यांच्या फेर्यात मंगरुळपीर बसस्थानक
By Admin | Updated: May 11, 2014 22:55 IST2014-05-11T21:53:52+5:302014-05-11T22:55:32+5:30
घाण अन् कचरा प्रवाशांच्या नाकीनऊ , आगार व्यवस्थापन निद्रिस्त

समस्यांच्या फेर्यात मंगरुळपीर बसस्थानक
मंगरूळपीर: सदैव प्रवाशाच्चया सेवेत ही बिरुदावली घेउन शेखी मिरवणार्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मंगरुळपीर बसस्थानक सद्यस्थितीत विविध समस्याचे माहेरघर बनल्याचे दिसून येत आहे. या बसस्थानकासमोर प्रचंड घाणीचे साम्राज्य वाढले असून अनेक बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांची डोकेदुखी बनली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे अनेकांना बसस्थानकावर जावे लागते. मात्र लांबपल्लयाच्या बसगाड्या वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांना दीर्घकाळ बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. परिणामी प्रवाश्यांचे नियोजन कोलमडते याच कारणामुळे अनेकांना नाईलाजास्तव खाजगी वाहनाकडे धाव घ्यावी लागते. एकेकाळी हे आगार उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकावर होत. े परंतु अलिकडील काळातील नियोजनाचा अभाव असल्याने दिवसेंदिवस उत्पन्न घट होत असल्याचे दिसून येत आहे ** या ठिकाणी पिण्याच्या पाणी व्यवस्था आहे. मात्र हे पिण्याचे पाणी दर्शनी भागात नसल्याने प्रवाशांना ते दिसत नाही. त्यामुळे पाण्याची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी वाहनस्थळ आहे. मात्र नेमके वाहन प्रवेशद्वारासमोर उभे राहत असल्याने प्रवाशांना येथून मार्ग काढणे अतिशय कठीण जात असल्याचे दिसून येते. तसेच प्रवाशासमोर अँटो उभे राहत असल्याने अनेकदा मोठा खोळंबा निर्माण होत आहे. अशा अनेक समस्थानी बसस्थानकाला घेरले असून येथील विविध समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी प्रवासीवर्गात केली जात आहे. ** बसस्थानकात अनेकदा कचरा साचलेला असतो. तसेच बसस्थानकासभोवताल घाण पाण्याचे डबके असल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी व डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होउन या डासांमुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे. तसेच बसस्थानकाला मागील बाजूने संरक्षक भिंत नसल्याने परिसरात गुरांचा संचार हे नित्यातीच बाब झाली आहे. याशिवाय परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. परंतु सदर स्वच्छतागृहाची आजमितीला कमालीची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना उघड्यावर लघुशंका उरकावी लागत आहे ** स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव असल्यामुळे येथील शौचालय अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. याशिवाय अकोलाकडे जाणार्या बसगाड्या ज्या ठिकाणापासून निघतात.त्या ठिकाणी प्रवाशांना बसण्याकरीता अखंड खुच्र्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यामधील अनेक खुच्र्या पूर्णत: निकामी झाल्याने प्रवाशांना खाली बसून बसगाडीची प्रतिक्षा करावी लागत आहे. ** एस.टी.चा प्रवास सुखदायक असे म्हटल्या जाते.परंतु बहुतांश बसगाड्या हय़ा भंगार झाल्याने कोणत्या क्षणी रस्त्यामध्ये बंद पडतात. शिवाय अनेक गाड्याचे पार्ट निकामी झाल्याने या गाड्याच्या अचानकपणे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटीचा प्रवास धोकादायक म्हणण्याची पाळी प्रवाशावर आली असे म्हटल्यास नवल वाटणार नाही