महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकले
By Admin | Updated: May 28, 2014 01:15 IST2014-05-28T01:07:55+5:302014-05-28T01:15:12+5:30
सायंकाळी महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना दुर्गा चौकातील जैन लॉन्सजवळ घडली.

महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकले
अकोला: सायंकाळी दूध आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना दुर्गा चौकातील जैन लॉन्सजवळ घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी दोन अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुर्गा चौकातील गोकुळ अपार्टमेंटमध्ये राहणार्या वैजयंती महेश करनाणी (४६) या सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास दूध घेऊन घरी परत जात असताना, जैन लॉन्सच्या गल्लीतून मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून नेले आणि पसार झाले. मंगळसूत्राची किंमत ५0 हजार रुपये आहे. महिलेच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला.