महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावले

By Admin | Updated: April 17, 2015 01:54 IST2015-04-17T01:54:48+5:302015-04-17T01:54:48+5:30

सिव्हील लाइन पोलिसांत गुन्हा दाखल.

The mangalasutra of the woman's throat shook | महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावले

महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावले

अकोला : मंदिरातून घरी परतणार्‍या महिलेच्या गळय़ातील २0 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोघा युवकांनी हिसकावून घेतले आणि पळ काढला. ही घटना बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास गणेशनगरात घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लहान उमरीतील गणेशनगरात राहणार्‍या रत्नप्रभा रामराव महल्ले (५७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास स्वामी सर्मथ मंदिरातून भजन ऐकून घरी जात असताना, गणेशनगरातील आपोतीकरांच्या घराजवळ मोटारसायकलवर आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळय़ातील २0 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. रत्नप्रभा महल्ले यांनी मंगळसूत्र पकडून ठेवल्याने चोरट्यांचा हातात अर्धेच मंगळसूत्र सापडले आणि त्याने पळ काढला. १0 ग्रॅम सोन्याची किंमत १५ हजार रुपये आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: The mangalasutra of the woman's throat shook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.