महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र लंपास

By Admin | Updated: June 1, 2015 02:35 IST2015-06-01T02:35:05+5:302015-06-01T02:35:05+5:30

फिरायला बाहेर पडलेल्या महिलेच्या गळय़ातील २0 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व १0 ग्रॅमची चेन लंपास.

The mangalasutra lumpas of the woman's gutters | महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र लंपास

महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र लंपास

अकोला: फिरायला बाहेर पडलेल्या महिलेच्या गळय़ातील २0 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व १0 ग्रॅमची चेन अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. गोरक्षण रोडवरील रामकृष्णनगरात राहणार्‍या अरुणा मानकर यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी त्या मैत्रिणीसह बाहेर फिरण्यासाठी जात असताना, गोरक्षण रोडजवळ अज्ञात मोटारसायकलस्वार युवकाने त्यांचेकडे येऊन गळय़ातील मंगळसूत्र व सोन्याची चेन हिसकावून नेली आणि पसार झाला. या सोन्याच्या दागिन्याची किंमत ७0 हजार रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: The mangalasutra lumpas of the woman's gutters