मंत्रालयात मांडले ठाण

By Admin | Updated: November 7, 2014 00:49 IST2014-11-07T00:49:57+5:302014-11-07T00:49:57+5:30

अकोला मनपा अधिकार्‍यांची बदलीसाठी धावपळ.

Mandalay Than in Mantralaya | मंत्रालयात मांडले ठाण

मंत्रालयात मांडले ठाण

अकोला : राज्यासह महापालिकेत सत्तापरिवर्तन होताच, मनपातील काही अधिकार्‍यांना बदलीचे वेध लागले आहेत. यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे स्वीय सहाय्यक म्हणून सेवा बजावणार्‍या अधिकार्‍यांनी पुन्हा मुंबई, कोकणातील संभाव्य मंत्र्यांकडे वशिला लावण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी मागील सात दिवसांपासून मंत्रालयातील जुन्या सहकार्‍यांकडे ठाण मांडल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील सहकारी बँकावर प्रशासक पदाची धुरा सांभाळणार्‍या अधिकार्‍यांची थेट नगर विकास विभागाच्या माध्यमातून अकोला मनपात बदली करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तत्पूर्वी संबंधित अधिकार्‍यांचा मोठा कालावधी राज्याचे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेसच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे स्वीय सहाय्यकपदावर सेवा बजावण्यात गेला. राज्यासह महापालिकेत सत्तापरिवर्तन होताच, काही अधिकार्‍यांना याठिकाणी काम करणे नकोसे झाल्याची चर्चा मनपा वतरुळात आहे. अशातच संबंधित अधिकार्‍यांनी आता भाजप व शिवसेनेतील संभाव्य मंत्र्यांची चाचपणी सुरू केली असून, त्यांच्याकडे स्वीय सहाय्यक किंवा पुन्हा सहकारी बँकांवर रुजू होण्यासाठी बदलीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: Mandalay Than in Mantralaya