हस्तलिखित सातबारा होणार इतिहासजमा

By Admin | Updated: January 3, 2015 00:50 IST2015-01-03T00:50:21+5:302015-01-03T00:50:21+5:30

सात-बारा ऑनलाईन करण्यास ३१ मार्चपर्यंतची मुदत; वाशिम जिल्हा प्रशासन लागले कामाला.

Manashakti will be remembered for the history | हस्तलिखित सातबारा होणार इतिहासजमा

हस्तलिखित सातबारा होणार इतिहासजमा

नागेश घोपे/ वाशिम: आगामी आर्थिक वर्षात हस्तलिखित सातबारा इतिहासजमा होणार आहेत. महसूल व जमाबंदी विभागाने सर्व जिल्हा प्रशासनांना सात-बारा तथा फेरफार ऑनलाईन करण्यासाठी ३१ मार्चची मुदत दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनांनी सात-बारा व फेरफार ऑनलाईन करण्यासाठी कंबर कसली असून, मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात ऑनलाईनचे प्रात्यक्षिक उरकण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना सात-बारा तथा फेरफार मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये, यासाठी शासनाने राज्यात ई-गव्हर्नसची संकल्पना रूजविण्यात आली. कार्यालयांचे कामकाज ह्यपेपरलेसह्ण करण्याचाही शासनाचा यामागे उद्देश होता. त्यानुसार तलाठी, तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयांमधील दस्तांचे डिजिटलायझेशन केले जाणार आहे. गत दोन वर्षापासून हे काम सुरू असले तरी, कामाची गती संथ होती; मात्र राज्यात सत्तारूढ झालेल्या नव्या सरकारने महसूल व जमाबंदी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन, या कामाची गती वाढविण्याचे आदेश दिले होते. त्या पृष्ठभूमिवर जमाबंदी आयुक्तांनी २३ डिसेंबर रोजी या कामांचा आढावा घेऊन, ३१ मार्चपर्यंत सर्व सात-बारा व फेरफारच्या ऑनलाईनची कामे पूर्ण करण्याची तंबी दिली आहे. मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत ही कामे पूर्ण करून, त्यांनतर ऑनलाईनचे प्रात्यक्षिक करण्याच्या सूचना जमाबंदी विभागाने जिल्हा प्रशासनांना दिल्या आहेत. त्यानुसार १ एप्रिल २0१४ पासून राज्यातील हस्तलिखित सात-बारा तथा फेरफार इतिहासजमा होऊन शेतकर्‍यांना सात-बारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीनेच काढावे लागणार आहेत. ३१ मार्चपर्यंतची मुदत असल्याने जिल्हाधिकार्‍यांपासून ते तलाठय़ांपर्यंत सर्व तयारीला लागले आहेत.

Web Title: Manashakti will be remembered for the history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.