अपघातात मामा-भाचा ठार
By Admin | Updated: March 18, 2016 02:07 IST2016-03-18T02:07:07+5:302016-03-18T02:07:07+5:30
भरधाव डंपरने कारला दिली धडक; औरंगाबाद महामार्गावरील घटना.

अपघातात मामा-भाचा ठार
मलकापूर (जि. बुलडाणा): भरधाव डंपरने कारला दिलेल्या जोरदार धडकेत मलकापूर येथील मामा-भाचे ठार झाल्याची घटना १६ मार्च रोजी सायंकाळी जळगाव खांदेशातील औरंगाबाद महामार्गावरील कुसुंबा गावानजीक घडली. अपघातात ठार झालेल्या या मामा-भाच्यावर १७ मार्च रोजी दुपारी मलकापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.
औरंगाबाद महामार्गावरील उमाळा परिसरातून मुरुमाने भरलेला एमएच १९ झेड-४९२३ हा डंपर भरधाव जळगाव खांदेशकडे जात असताना समोरून येणार्या एमएच २0 बीवाय-५९९५ या कारला जोरदार धडक दिली. डंपरने कारला दिलेल्या धडकेत कार डंपरच्या पुढच्या साईडमध्ये घुसल्याने चक्काचूर झाली. या अपघातात कारमधील दिनेश साहेबराव गवळी (वय ३८) व पवन सोमनाथ यादव (वय २२) दोघे रा. जाधववाडी मलकापूर हे मामा-भाचे ठार झालेत. यातील मृतक दिनेश गवळी व पवन यादव हे कामानिमित्त जळगाव येथे गेले होते. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत डंपर चालक किशोर नन्नवरे याला ताब्यात घेतले असून, सदर डंपर शंकर बिर्हाडे यांच्या मालकीचे असल्याचे कळते.