महिला समृद्धी योजनेत गैरव्यवहार
By Admin | Updated: October 27, 2014 23:44 IST2014-10-27T23:36:18+5:302014-10-27T23:44:07+5:30
बुलडाणा जिल्हा व्यवस्थापकाचा काढला पदभार : कोट्यवधीचे वाटप थांबविले.

महिला समृद्धी योजनेत गैरव्यवहार
सिद्धार्थ आराख / बुलडाणा
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या महिला समृद्धी योजनेमध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पी.टी.पवार यांचा तडकाफडकी पदभार काढण्यात आला आहे. तर अमरावती विभागीय व्यवस्थापक जी.एस.साळुंके यांनी बुलडाणा कार्यालयातील संपूर्ण रेकॉर्ड जप्त करून या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू केली आहे.
विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी राज्यातील अन्नाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला राज्यशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. महिला समृद्धी योजनेंतर्गत हा निधी खर्च करावयाचा होता. बुलडाणा येथील महामंडळाला नऊ कोटी रुपये प्राप्त झाले होते. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निधी वाटप करण्याचे मंडळाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार मोठय़ा प्रमाणावर प्रस्तावही बोलावण्यात आले. एका महिला लाभार्थ्याला ५0 हजार रुपये प्रमाणे जवळपास ११५३ प्रस्ताव बुलडाणा कार्यालयाने तयार केले. तर यापैकी २५0 चेकचे म्हणजे सुमारे १ कोटी २५ लाख रुपयाचे वाटपही केले; मात्र हे वाटप करताना कार्यालयातील अधिकारी व एजंट यांच्या संगनमताने शेकडो बोगस प्रस् ताव बनवून लाखो रुपयाचे वाटप सुरू असल्याच्या तक्रारी झाल्या. यामध्ये काही लाभा र्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणसुद्धा सुरू केले होते. याची गंभीर दखल घेत मुंबई कार्यालयाने अमरावती विभागीय कार्यालयाचे अधिकारी साळुंके यांना चौकशीसाठी बुलडाणा येथे पाठविले. साळुंके यांनी चौकशी करून उर्वरित १00 प्रस्ताव व त्यासोबत प्र त्येकी ५0 हजार रुपयाचे चेक असे संपूर्ण दप्तर जप्त केले. तर जिल्हा व्यवस्थापक पी.टी. पवार यांचा पदभार काढून लेखापाल विजय जाधव यांच्याकडे कार्यालयाचा पदभार दिला. हे प्रकरण आता जिल्हा व्यवस्थापक व कार्यालयातील कर्मचार्यांवर अंगलट येऊ शकते.
महिला समृद्धी योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांना ५0 हजार रुपये तडकाफडकी मिळू लागल्याने प्रस्तावाचा ओघ वाढला होता. पुढे अनेकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे चौकशी लागली व सध्या वाटप बंद झाले असल्याचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक विजय जाधव यांनी सांगीतले.