शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

माळी समाजाचा राज्यव्यापी ‘सत्तासंपादन ’महामेळावा १५ सप्टेंबरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:36 IST

तीर्थक्षेत्र अरण येथे राज्यव्यापी सर्वशाखीय माळी समाजाचा सत्तासंपादन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

अकोला : माळी समाजाला राज्यकर्ती जमात बनविण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण येथे राज्यव्यापी सर्वशाखीय माळी समाजाचा सत्तासंपादन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माळी समाज महामेळावा ट्रस्ट समितीचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सोमवारी येथे दिली.अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माळी समाजाला राज्यकर्ती जमात बनविणे, समाजाचा सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक व राजकीय विकास करणे, संत शिरोमणी सावता महाराज संजिवन समाधी तीर्थक्षेत्र ‘अरण’ ला ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त करणे, सावता महाराज यांच्या नावाने वनऔषधी संशोधन केंद्राची निर्मिती करणे, संविधानाची जोपासना व आरक्षण संरक्षित करण्याच्या ध्येयासाठी माळी समाजाचा राज्यव्यापी सत्तासंपादन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असून, राज्यातील एक लाख माळी समाजबांधव सत्तासंपादन महामेळाव्यात सहभागी होणार असल्याचा दावा देखिल शंकरराव लिंगे यांनी केला. सत्तेत वाटा मिळविल्याशिवाय माळी समाजाला न्याय मिळणार नाही. त्यानुषंगाने समाजाचे प्रबोधन करण्यासाठी सत्तासंपादन मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगीतले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोडे, अ‍ॅड.संतोष रहाटे, बालमुकुंद भिरड, दिनकर वाघ, प्रभा शिरसाट, शोभा शेळके, डॉ.प्रसन्नजीत गवई, शेख साबीर उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी