शहरात हिवतापाची साथ
By Admin | Updated: October 26, 2014 00:44 IST2014-10-26T00:44:44+5:302014-10-26T00:44:44+5:30
अकोला महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी.

शहरात हिवतापाची साथ
अकोला : शहरात कोठेही नजर टाका, घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या व पाण्याचे डबके नजरेस पडतात. डासांच्या पैदासीला आळा घालण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असून, शहरात हिवतापाच्या साथीचा उद्रेक झाला आहे. शहरात हिवताप, कावीळ व डेंग्यूच्या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. विविध साथरोगांमुळे अकोलेकरांचा जीव धोक्यात आला आहे. प्रभाग उच्चभ्रू नागरिकांचा असो वा ह्यस्लम एरियाह्ण, ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. फुटलेल्या जलवाहिन्यांमधून निघणारे पाणी ठिकठिकाणी साचत आहे. मुख्य रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणे, प्रत्येक प्रभागातील नाल्या, सर्व्हिस लाईन घाणीने गच्च भरल्या आहेत. मोकळ्य़ा जागा गाजर गवत, काटेरी झुडपांनी वेढल्या आहेत. असे वातावरण डासांच्या पैदासीला पोषक असल्याने त्यांची पैदास वाढली आहे. यामधूनच शहरात हिवतापाची साथ पसरली असून, खासगी रुग्णालये गर्दीने खच्चून भरली आहेत.
*मलेरिया विभाग हतबल
हिवतापाला आळा घालण्यासाठी मनपाचा मलेरिया विभाग अपयशी ठरला आहे. शहरातील ३६ प्रभागांमध्ये धुरळणी व फवारणी करण्यासाठी मलेरिया विभागाकडे केवळ चार फॉगिंग मशीन आहेत.