शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

‘कुलर’चा वापर जपून करा; अपघात टाळा! - महावितरणचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 4:45 PM

अकोला : तापमानापासून बचाव करण्यासाठी कुलरचा फायदा होत असला तरी, वापर करताना योग्य काळजी न घेतल्यास कुलर नुकसानदायकही ठरू शकतो.

ठळक मुद्देवापर करताना योग्य काळजी न घेतल्यास कुलर नुकसानदायकही ठरू शकतो. मागील वर्षी महावितरणच्या अकोला परिमंडळ अंतर्गत कुलरच्या माध्यमातून शॉक लागून दुर्घटना घडल्या होत्या.सुरक्षिततेचे नियम पाळल्यास कुलरच्या माध्यमातून खरोखरच ‘कूल’ राहता येईल, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अकोला : एप्रिल महिन्याचा उत्तरार्ध सुरु होताच सूर्य अक्षरश: आग ओकत असून, पारा ४४ अंश सेल्सियवर गेला आहे. वाढत्या उष्म्याचा सामना करण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करत आहेत. उन्हाळ्यात घर, दुकाने, कार्यालये अशा सर्वच ठिकाणी कुलरचा वापर करतात. तापमानापासून बचाव करण्यासाठी याचा फायदा होत असला तरी, वापर करताना योग्य काळजी न घेतल्यास कुलर नुकसानदायकही ठरू शकतो. मागील वर्षी महावितरणच्या अकोला परिमंडळ अंतर्गत कुलरच्या माध्यमातून शॉक लागून दुर्घटना घडल्या होत्या. बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड (मोरेश्वर)येथील आकाश वाडेकर, पातूर तालुक्यातील खानापूर येथील प्रभाबाई अंबुलकर, बाभूळगाव जहाँगिर येथील ओम सोनटक्के, वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील अर्चना डोके व त्यांची मुलगी हे कुलरच्या माध्यमातून लागलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्युमूखी पडले होते. म्हणून कुलर वापरताना पुढील सुरक्षिततेचे नियम पाळल्यास कुलरच्या माध्यमातून खरोखरच ‘कूल’ राहता येईल, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.कुलरमध्ये कसा उतरतो ‘करंट’?१ - फेजवायर स्वीच म्हणून टाकल्यामुळे स्वीच आॅफ केला तरी लाईव्ह वायरचा परिणाम कुलरच्या बॉडीमध्ये येतो.२ - कुलरमध्ये पाणी असल्यामुळे इलेक्ट्रीकल सर्किट हा कुलरच्या लोखंडी बॉडीत येऊन आपल्या शरीराचा स्पर्श झाल्यास विजेचा धक्का बसतो.३ - स्वीचमधील लाईव वायर, फेज, फेज वायरमधील तार कुलरच्या बॉडीला चुकून लागल्यास लिकेज करंट येऊन धक्का बसतो.अशी घ्या काळजी* कुलरच्या टपमध्ये पाणी भरताना प्लग पिन काढून स्वीच चालू करावा.* कुलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे.* ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करू नये.* कुलरमध्ये पाणी भरतांना टाकीच्या खाली घसरून ते पाणी बाजूला जमिनीवर फैलणार नाही याची काळजी घ्यावी.* लहान मुलांना कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे व कुलरच्या जवळ खेळणार नाही याची काळजी घ्यावी.* कुलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी.*घरामध्ये रनिंग अर्थ वायरची जोडणी मीटर बोर्डवरील अर्थ बोल्टशी करण्यात यावी तसेच त्याची जोडणी स्वीचबोर्डमधील ३-पीन प्लग सॉकेटच्या अर्थ पॉईंटशी करण्यात यावी.कुलरचा वापर करताना सुरक्षा उपाय महत्वाचे आहेत. योग्य काळजी घेतल्यास कुलच्या माध्यमातून शॉक लागण्याच्या घटना टाळता येऊ शकतात.

- विकास आढे, जनसंपर्क अधिकारी, अकोला परिमंडळ

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण