मेजर ध्यानचंद हेच भारतरत्नचे पहिले दावेदार!
By Admin | Updated: January 12, 2015 01:42 IST2015-01-12T01:42:27+5:302015-01-12T01:42:27+5:30
फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांचे मत
_ns.jpg)
मेजर ध्यानचंद हेच भारतरत्नचे पहिले दावेदार!
अकोला: क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न हा मानाचा पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरला देण्यात आला. त्याला माझा विरोध नाही; मात्र क्रीडा क्षेत्रातून या पुरस्कारासाठी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद हेच पहिले दावेदार होते, असे मत फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
रविवारी आयोजित वॉकथॉन स्पर्धेसाठी अकोल्यात आलेले मिल्खा सिंग यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधताना खेळाडूंचे कर्तव्य व जबाबदार्या यावर प्रकाश टाकला.
प्रश्न: सचिन तेंडूलकरला मिळालेल्या भारतरत्न पुरस्काराबद्दल आपलं मत काय?
सचिनला भारतरत्न देण्याबाबत माझी काहीच हरकत नाही; मात्र क्रीडा क्षेत्रातून जर भारतरत्न पुरस्कार द्यायचाच होता तर सर्वप्रथम तो मेजर ध्यानचंद यांना द्यायला हवा होता. मेजर ध्यानचंद यांचे देशाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. सचिनला नंतरही हा पुरस्कार देता आला असता.
प्रश्न : या पुरस्काराच्या निकषाबद्दल तुमचे मत काय आहे?
भारतरत्न पुरस्कार देताना त्या व्यक्तीने देशाप्रती दिलेले योगदान बघणे गरजेचे आहे. कुणाचे किती योगदान आहे, यावर पुरस्काराचे मापदंड ठरायला हवे. त्या खेळाडूनचा देशाच्या क्रीडा क्षेत्रास किती फायदा झाला, हे बघणे गरजेचे आहे. केवळ खेळाडूची लोकप्रियता बघणे योग्य नाही.
प्रश्न : तुम्हाला भारतरत्न द्यायला हवा होता का?
मी माझ्यावतीने मला भारतरत्न द्या, अशी मागणी कधीच करणार नाही; मात्र मी त्या पुरस्काराच्या योग्यतेचा आहे, असे शासनाला वाटले तर शासन मला पुरस्कार देईल. हे शासनाने ठरवायला हवे. मी माझ्याकडून कोणतीही मागणी करणार नाही. कोणत्याही खेळाडूने कधीच कोणत्या पुरस्काराची मागणी करू नये. आपण त्या पुरस्काराच्या योग्य असलो तर पुरस्कार मिळतातच.
प्रश्न : खेळाडूंच्या आयुष्याविषयी तुम्हाला काय वाटते?
खेळाडूंनी खेळत राहायला हवे. पदकाची अपेक्षा असली तरी, तेच मूळ ध्येय असायला नको. खेळण्यामुळे विविध आजार दूर पळतात व आरोग्य चांगले राहते.