शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

पश्चिम वऱ्हाडात होणार उमेदवारी वाटपात उलथापालथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 23:45 IST

काँग्रेस आघाडीसह, युती आणि वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारी वाटपात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत.

- राजेश शेगोकार

अकोला: पश्चिम वऱ्हाडात काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसह, युती आणि वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारी वाटपात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत. अकोल्यात पाच मतदारसंघ असून, यापैकी चार भाजपाकडे व एक भारिप-बमसं (वंचित) कडे आहे. भाजपाचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे यांच्यासह भारिपचे बळीराम सिरस्कार यांच्या उमेदवारीबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातून शर्मा हे सलग पाच वेळा विजयी झाले असून, ते सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे यावेळी नवा उमेदवार द्यावा, असा आग्रह इच्छुकांनी धरला आहे.भाजप यावेळी ७५ वर्षे पार केलेला उमेदवार देणार नसल्याने अकोला पश्चिमसाठी वयाची ही अट आणखी कमी होईल, अशी आशा इच्छुकांना आहे. मूर्तिजापूरमधून आ. पिंपळे हे दुसऱ्यांदा विजयी झाले असून, यावेळी त्यांना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जाहीर विरोध करण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे येथे युतीधर्मच धोक्यात आहे. भाजपमधूनही पिंपळे यांना मोठ्या प्रमाणात विरोध असून, भाजपमधील खासदार संजय धोत्रे यांचा गट अजूनही त्यांच्यापासून अंतर ठेवून असल्याची चर्चा असल्याने पिपंळे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. बाळापुरातून सलग दुसऱ्यांदा भारिप-बमसंचा गड सर करणारे आ. बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी सामाजिक समीकरणांमध्ये अडकली आहे. सिररस्कार यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी बुलडाण्यातून रिंगणात उतरविले होते. त्यानंतर ते आता बाळापुरात उमेदवार नसतील, अशी चर्चा सुरू झाली होती. या मतदारसंघातील सामाजिक समीकरणे लक्षात घेता काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण, यावर वंचितची उमेदवारी ठरणार आहे. काँग्रेसने मुस्लीम उमेदवार दिल्यास सिरस्कारांना पुन्हा संधी मिळू शकते; मात्र काँग्रेसने माळी समाजाचे कार्ड खेळल्यास वंचितकडून मुस्लीम उमेदवार तयार ठेवला आहे. दुसरीकडे मराठा समाजाला उर्वरित चार मतदारसंघात प्रतिनिधित्व देता आले नाही तर वंचितकडून बाळापुरातही मराठा कार्ड खेळण्याचा पर्याय खुला असल्याने सिरस्कार चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात भाजपातीलच इच्छुकांनी स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरला होता; मात्र पक्ष भारसाकळे यांच्या पाठीशी राहील, असे संकेत बुथप्रमुखांच्या मेळाव्यातच मिळाले होते. त्यामुळे भारसाकळे कुणावरही आरोप-प्रत्यारोपात न अडकता कामाला लागलेले दिसत आहेत. या मतदारसंघात युतीचे जागा वाटप हा कळीचा मुद्दा असल्याने सेनेला हा मतदारसंघ मिळालाच तर उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. वाशिममधील वाशिम या मतदारसंघात भाजपामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. आ. लखन मलिकांनी सलग दोनदा विजय मिळविला असला तरी त्यांच्या विरोधात पक्षातही नाराजीचा सूर आहे. मलिक हे तिसºयांदा आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात एन्टी इन्कम्बन्सी असल्याने भाजपकडून येथे धक्कातंत्राचे राजकारण होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019