जुने शहरातील मुख्य रस्ते कडकडीत बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST2021-05-11T04:18:51+5:302021-05-11T04:18:51+5:30
रुग्णांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही दाखवला परतीचा मार्ग मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी जुने शहरवासीयांना जयहिंद चौक ते सिटी कोतवाली चौक ...

जुने शहरातील मुख्य रस्ते कडकडीत बंद!
रुग्णांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही दाखवला परतीचा मार्ग
मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी जुने शहरवासीयांना जयहिंद चौक ते सिटी कोतवाली चौक हा प्रमुख मार्ग आहे. सोमवारी कडक निर्बंधादरम्यान पोलिसांकडून हा मार्ग कडकडीत बंद ठेवण्यात आला. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांच्या गर्दीवर अंकुश लावणे शक्य झाले; मात्र रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीही हा रस्ता बंद असल्याचे सांगत पोलिसांकडून त्यांना परतीचा मार्ग दाखविण्यात आला. सर्वोपचार रुग्णालयात जायचे असले, तर बायपास मार्गे जाण्याचा सल्लाही यावेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला.
भांडपुरा चौकातच रिकामटेकड्यांची गर्दी
पोलिसांकडून जुने शहरातील प्रमुख मार्ग बंद करण्यात आला; मात्र बाळापूर रोडवरील भांडपुरा पोलीस चौकीजवळ काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसून आले. या चौकात पोलिसांचे पथक असून, त्यांच्यासमोरच येथील लोक विनामास्क चौकात गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून आले.