आठ पंचायत समितींमध्ये महिलाराज

By Admin | Updated: September 14, 2014 00:42 IST2014-09-14T00:42:51+5:302014-09-14T00:42:51+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापतिपदांची आज निवडणूक.

Mahila Raj in eight Panchayat Samiti | आठ पंचायत समितींमध्ये महिलाराज

आठ पंचायत समितींमध्ये महिलाराज

बुलडाणा : जिल्ह्यातील १३ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी उद्या १४ सप्टेबर रोजी निवडणूका होऊ घातल्या असून १३ पैकी आठ ठिकाणी महिला सभापती विराजमान होणार आहेत. तर ५ पंचायत समितीवर सभापती पदासाठी पुरूषांना संधी मिळणार आहे. अडीच वर्षाचा सभापती पदाचा कार्यकाळ पुर्ण होत असल्याने उद्या तेराही पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. यामध्ये बुलडाणा, लोणार, सिंदखेडराजा, खामगाव, शेगाव, जळगाव जा., मलकापूर आणि देऊळगावराजा येथे महिलांना सभापती होण्याचा सन्मान मिळणार आहे तर, मोताळा, मेहकर, संग्रापूर, चिखली आणि नांदूरा या पाच पंचायत समितीवर पुरुषांना संधी मिळणार आहे.

Web Title: Mahila Raj in eight Panchayat Samiti