संजय धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महारोग निवारण महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:25 IST2021-02-27T04:25:08+5:302021-02-27T04:25:08+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोट भाजपाने जनकल्याण हेतू भाजपा शहराध्यक्ष कनक कोटक यांच्या पुढाकाराने आर्य समाज मंदिरात महारोग ...

Mahayagya on the occasion of Sanjay Dhotre's birthday | संजय धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महारोग निवारण महायज्ञ

संजय धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महारोग निवारण महायज्ञ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोट भाजपाने जनकल्याण हेतू

भाजपा शहराध्यक्ष कनक कोटक यांच्या पुढाकाराने आर्य समाज मंदिरात महारोग निवारण महायज्ञ संपन्न झाला. याप्रसंगी होमहवन, पूजा-अर्चा, आहुती, आरती करून ना.धोत्रे यांना समाजसेवेसाठी उदंड आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली. आर्य समाजाचे स्वामी स्वातंत्रतानंद सरस्वती, क्रांतीमुनींजी, संतोष राऊत यांनी मंत्रोच्चारात होमहवन केला. यावेळी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, विनायक भोरे, प्रा. अशोक गावंडे, कुसुम भगत, राजेश नागमते, राजेश रावणकर, गजानन लोणकर, मधुकर बोडखे, पांडुरंग ताडे, मंगेश लोणकर, मंगेश चिखले, मंगेश पटके व लता साबळे, संतोष झुनझुनवाला, उमेश पवार, राजू मावलकर, गोपाल मोहोड, प्रवीण डिक्कर, सिंधू गडम, चंचल पितांबरवाले, गजानन आकोटकर, विलास बोडखे, सुहास भांडे, जलीलभाई, रवींद्र केवटी, सागर बोरोडे, विजय जवंजाळ, इकबालभाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालय व स्व. डॉ.नागमते यांच्या दवाखान्यातील रुग्णांना आहाराचे वितरण करण्यात आले. (वा.प्र.) ८ बाय ९ (फोटो)

Web Title: Mahayagya on the occasion of Sanjay Dhotre's birthday