शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्या विभाजनाचे संकेत!

By admin | Updated: February 27, 2015 00:28 IST

अमरावतीला होणार नवे परिमंडळ ?

राजरत्न सिरसाट/अकोला : वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) अकोला येथील परिमंडळाचे विभाजन करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू असून, अमरावतीला नवे परिमंडळ होणार असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने माहिती घेतली आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती हे पाच जिल्हे अकोला येथील महावितरण मुख्यालयांतर्गत आहे. एक परिमंडळ म्हणजेच मुख्यालय होण्यासाठी जवळपास १२ ते १५ लाख ग्राहकांची गरज असते. याचाच अर्थ एका जिल्हय़ात (सर्कल) जवळपास ३ लाखांच्यावर वीज ग्राहक हवेत. तेव्हाच त्या ठिकाणी मुख्य अभियंता अर्थात परिमंडळ मुख्यालयाची स्थापना केली जाते. अकोला परिमंडळात सात अधीक्षक अभियंते आहेत. यातील दोन अधीक्षक अभियंते हे पायाभूत प्रकल्पाचे काम पाहतात. एका सर्कलमध्ये ग्रामीण आणि शहर असे दोन कार्यकारी अभियंते असतात. या परिमंडळात दहा कार्यकारी अभियंते आहेत. पण अकोला येथील मुख्यालयाचे विभाजन केल्याने अमरावती येथे होणार्‍या परिमंडळात एवढे ग्राहक आहेत का, हा प्रश्न येथील महावितरणच्या कर्मचार्‍यांमध्ये उपस्थित होत आहे. अकोला परिमंडळाचे विभाजन करू न अमरावती आणि यवतमाळ या दोन जिल्हय़ाचे नवे परिमंडळ अर्थात मुख्यालय अमरावती येथे केले जाणार आहे. उर्वरित अकोला, बुलडाणा आणि वाशिम हे तीन जिल्हे अकोला मुख्यालयाशी संलग्नित राहतील. याकरिता ऊर्जा मंत्रालयाने माहिती घेतली आहे. या परिमंडळात दोन लाखांच्यावर कृषिपंपाचा अनुशेष असूून, अनेक वीज विकासाची कामे रखडली आहेत. शेकडो गावे अजूनही भारनियमनाच्या झळा सोसत आहेत. या पूष्ठभूमीवर कामे गतीने आणि सुरळीत होण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. राज्यात सध्या भांडूप, औरंगाबाद, अकोला, नागपूर, नागपूर ग्रामीण, नाशिक, पुणे, कल्याण, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, जळगाव, बारामती, नांदेड असे १४ महावितरणचे परिमंडळ कार्यालय आहेत. नाशिक परिमंडळाचे विभाजन करू न यापूर्वी जळगाव येथे परिमंडळ कार्यालय झालेले आहे. अकोला परिमंडळाचे विभाजन झाल्यास राज्यात हे महावितरणचे १५ वे परिमंडळ कार्यालय असेल.राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अकोला परिमंडळ कार्यालयाच्या विभाजनाची चर्चा सुरू असेल पण शासन स्तरावर अद्याप अकोला परिमंडळाच्या विभाजनाबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले.