कृषिपंप जोडणीसाठी महावितरणचा पुढाकार

By Admin | Updated: August 5, 2015 22:56 IST2015-08-05T22:56:30+5:302015-08-05T22:56:30+5:30

‘डिमांड नोट’साठी संपर्क साधण्याचे शेतक-यांना आवाहन.

Mahavitaran's initiative for connecting agriculture | कृषिपंप जोडणीसाठी महावितरणचा पुढाकार

कृषिपंप जोडणीसाठी महावितरणचा पुढाकार

अकोला- अमरावती परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये कृषी पंप जोडणीबाबत शेतकर्‍यांच्या असंख्य तक्रारी आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणकडून पुढाकार घेण्यात आला असून, नवीन जोडणीसाठी प्रयत्न केले जात आहे. कृषिपंप जोडणीसाठी अर्ज करणार्‍या शेतकर्‍यांना ह्यडिमांड नोटह्णसाठी संपर्क करण्याचे आवाहन महावितरणतर्फे बुधवारी करण्यात आले. महावितरणतर्फे कृषिपंपासाठी नवीन वीज जोडणी देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांकडून अर्जही स्वीकारण्यात आले. पाच जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अर्ज करूनही शेतकर्‍यांना डिमांड नोट मिळाली नाही, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महावितरणने डिमांड नोटसाठी शेतकर्‍यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. डिमांड नोट देण्यात आल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करून शेतकर्‍यांना तत्काळ वीज जोडणी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

*तक्रारीची दखल घेणार

           विभागीय कार्यालय उपविभागीय कार्यालयामध्ये शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी उपविभागीय कार्यालयात ग्राहकांच्या काही अडचणी असल्यास त्याची दखल विभागीय कार्यालयाकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Mahavitaran's initiative for connecting agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.