ग्रीन अकोला..साठी मनपाची महारॅली

By Admin | Updated: August 17, 2014 01:50 IST2014-08-17T01:48:40+5:302014-08-17T01:50:14+5:30

आकर्षक देखावे, लेजीम, मोटारसायकल पथक ठरले आकर्षण.

Maharoali for Green Akola | ग्रीन अकोला..साठी मनपाची महारॅली

ग्रीन अकोला..साठी मनपाची महारॅली

अकोला : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्यावतीने ह्यग्रीन अकोला, क्लीन अकोलाह्ण संकल्पपूर्तीसाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी शहरात महारॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांंंसह सेवाभावी, सामाजिक व संस्था, महिला बचत गटांसह लेजीम पथक, बॅन्ड पथकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन एकतेचा संदेश दिला.
महापालिकेच्यावतीने ह्यग्रीन अकोला, क्लीन अकोलाह्ण संकल्पपूर्तीसाठी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला महापौर ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी हिरवी झेंडी दिली. यावेळी माजी महापौर सुमनताई गावंडे, हरीष आलीमचंदानी, गटनेता गजानन गवई, दिलीप देशमुख, उषाताई विरक, अरुंधती शिरसाट, गोपी ठाकरे, शरद तुरकर, योगेश गोतमारे, सतीश ढगे, बबलू जगताप, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, चंद्रशेखर गुल्हाणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, गौतम गवई व मनपाचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. महारॅली अकोला शहरातील विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Maharoali for Green Akola