महाराष्ट्रीयन खेळाडूंचे पाऊल पडते पुढे!

By Admin | Updated: August 28, 2016 23:08 IST2016-08-28T23:08:15+5:302016-08-28T23:08:15+5:30

क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंचे सुयश; गत तीन वर्षांत १६६५ मेडलचे मानकरी.

Maharashtra players move ahead! | महाराष्ट्रीयन खेळाडूंचे पाऊल पडते पुढे!

महाराष्ट्रीयन खेळाडूंचे पाऊल पडते पुढे!

संतोष वानखडे
वाशिम, दि. २८ : क्रीडापटूंचे नैपुण्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने पुणे येथे स्थापन केलेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी गत तीन वर्षांत राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पधार्ंमध्ये तब्बल १६६५ मेडल प्राप्त केले आहेत. यामध्ये ६८५ सुवर्ण, ५७१ रजत आणि ४0९ कांस्य पदकांचा समावेश असल्याची नोंद क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या दप्तरी आहे.
विद्यार्थी व युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या हेतूने राज्य सरकार गत काही वर्षांपासून क्रीडा धोरण राबवित आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पधार्ंचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच खेळांना प्रोत्साहन देण्यासोबत खेळाडूंचे नैपुण्य विकसित करण्यासाठी राज्य शासनाने पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्थापना केली आहे. या क्रीडापीठाकडून राज्यातील ८ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता क्रीडा कौशल्य चाचण्या घेतल्या जातात. निवड झालेल्या खेळाडूंना ८ ते १0 वर्षे आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते.
राज्यात ११ क्रीडा प्रबोधिनी आहेत. या क्रीडा प्रबोधिनीतील प्रती विद्यार्थ्यांवर दरमहा नऊ हजार रुपये खर्च शासनातर्फे केला जातो. गत तीन वषार्ंत या प्रबोधिनीत एकूण दोन हजार खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धांचे धडे गिरविले. २0१५-१६ मध्ये ५९३ प्रशिक्षणार्थींची निवड झाली. गत तीन वर्षांतील या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेऊन तब्बल १६६५ पदके प्राप्त केली आहेत. आतापर्यंत या प्रबोधिनीच्या २१ खेळाडूंनी शिव छत्रपती राज्य क्रीडा सन्मान प्राप्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गत तीन वर्षांत सहा सुवर्ण, ११ रजत व १४ कांस्य पदके मिळविली आहेत. राष्ट्रीय स्तर स्पर्धेत २३६ सुवर्ण, १९२ रजत आणि १२५ कांस्य पदके मिळविली. राज्यस्तरीय स्पर्धेत ४४३ सुवर्ण, ३६८ रजत आणि २७0 कांस्य पदके मिळविली असल्याची नोंद क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या दप्तरी आहे.

Web Title: Maharashtra players move ahead!