पश्चिम विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे अजिंक्यपद महाराष्ट्राकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 14:16 IST2019-05-18T14:16:32+5:302019-05-18T14:16:36+5:30
अकोला: मापसा (गोवा) येथे झालेल्या पश्चिम विभागीय ज्युनिअर मुले आणि मुली बॉक्सिंग अजिंक्यपद-२०१९ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने १६ सुवर्ण व पाच रौप्य पदकांची कमाई करीत अजिंक्यपद पटकावले.

पश्चिम विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे अजिंक्यपद महाराष्ट्राकडे
अकोला: मापसा (गोवा) येथे झालेल्या पश्चिम विभागीय ज्युनिअर मुले आणि मुली बॉक्सिंग अजिंक्यपद-२०१९ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने १६ सुवर्ण व पाच रौप्य पदकांची कमाई करीत अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या गटात १० सुवर्ण आणि दोन रौप्य तर मुलींच्या गटात सहा सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई महाराष्ट्र संघाने केली. अकोल्याच्या विश्व गोटे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत गोव्याच्या सचिन महातो याचा पराभव करीत ७० ते ७५ किलो वजनगटाचे विजेतेपद मिळविले.
महाराष्ट्राच्या मुले व मुली दोन्ही संघांनी विजेतेपद आणि मोस्ट प्रोमोसिंग बॉक्सर पुरस्कार पटकावला. मुलांमध्ये ४६ किलो वजनगटात अजय शिर्के, ४८ किलो वजनगटात राज पाटील, ५० किलो वजनगटात हर्षिद शेख, ५२ किलो वजनगटात अर्पित जैसवार, ५४ किलो वजनगटात आदित्य गौड, ५७ किलो वजनगटात आयुष मोकाशी, ६० किलो वजनगटात रहिम शेख, ६३ किलो वजनगटात कुणाल घोरपडे, ७० किलो वजनगटात चेतन काळेकर, ७५ किलो वजनगटात विश्व गोटे यांनी सुवर्णपदक पटकावले. ऋषिकेश गोसावी आणि ओम टोपले यांनी रौप्य पदक मिळविले.
मुलींच्या गटात ४६ किलो वजनगटात जान्हवी चौरी, ४८ किलो ऋषिका होले, ५२ किलो मृणाल जाधव, ५४ किलो आर्या भारटके, ५७ किलो नृता शाह, ६३ किलो दिशा पाटील यांनी सुवर्ण पदक मिळविले. ५० किलो वजनगटात हर्षदा लोहत, ६० किलो सादिया शेख आणि ६६ किलो वजनगटात सृष्टी जाधव यांनी रौप्य पदक मिळविले. विश्व गोटे याला राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट आणि राष्ट्रीय पंच तथा प्रशिक्षक विजय गोटे यांचे मार्गदर्शन लाभले.