शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

Maharashtra Election 2019 : ‘वंचित’ला देणार ‘एमआयएम’ आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 11:00 IST

राज्यातील पाच जागांवर ‘एमआयएम’ने गुरुवारी उमेदवार जाहीर केल्याने ‘वंचित’समोर ‘एमआयएम’चे आव्हान राहणार आहे.

- राजेश शेगोकारअकोला: दलित, मुस्लीम मतांची मोट बांधण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी गठित झालेल्या वंचित बहुजन व ‘एमआयएम’ आघाडीने विधानसभा निवडणुकीपूर्वीच काडीमोड घेतला. त्यामुळे वंचित व एमआयएम आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम वºहाडातील दोन जागांसह राज्यातील पाच जागांवर ‘एमआयएम’ने गुरुवारी उमेदवार जाहीर केल्याने ‘वंचित’समोर ‘एमआयएम’चे आव्हान राहणार आहे. विशेष म्हणजे, अकोल्यातील बाळापूर व बुलडाण्याच्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात ‘वंचित’च्याच सदस्यांनी बंडखोरी करून ‘एमआयएम’ची उमेदवारी मिळविली आहे.वंचित व एमआयएमने लोकसभा निवडणुकीत एकत्रित निवडणूक लढविल्यामुळे राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस आघाडीला फटका बसला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या आघाडीचा धसका घेतला होता; मात्र एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ‘वंचित’मधून तडकाफडकी बाहेर पडत आघाडी संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर एमआयएम व वंचित पुन्हा एकत्र येऊ शकतात, असे संकेत दोन्ही पक्षांकडून मिळाले होते; मात्र दोन्ही पक्ष परस्परांविरोधात दंड थोपटून उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवार, ३ आॅक्टोबर रोजी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी पाच उमेदवारांची घोषणा केली असून, या पाचही मतदारसंघांत ‘वंचित’ची ताकद दखलपात्र आहे. अकोल्यातील बाळापूर मतदारसंघात ‘वंचित’चे विद्यमान आमदार आहेत. तेथे वंचितचे डॉ. रहेमान खान यांनी बंडखोरी करीत एमआयएमची उमेदवारी घेतली आहे. विशेष म्हणजे, डॉ. खान यांना अकोला पश्चिममधून उमेदवारी देण्याची शिफारस ‘वंचित’च्याच जिल्हाध्यक्षांनी जाहीरपणे केली होती. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मो. सज्जाद यांनी ‘वंचित’ची साथ सोडत एमआयएमचा हाथ पकडला आहे. मो. सज्जाद यांच्या पत्नी बुलडाण्याच्या नगराध्यक्ष असून, ते स्वत: भारिपकडून नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. अ‍ॅड. आंबेडकरांनी निवडणूक लढविलेल्या सोलापुरात सोलापूर पश्चिममध्ये आतिष बनसोडे, उत्तर नागपूरमध्ये कीर्ती डोंगरे, बीडमधील माजलगाव येथून शेख अमर जैनुद्दीन यांना ‘एमआयएम’ची उमेदवारी घोषित झाली आहे.

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019balapur-acबालापूरbuldhana-acबुलढाणा