शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

Maharashtra Election 2019 : अकोला जिल्ह्यात १०७ उमेदवारांचे १५८ अर्ज दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 1:23 PM

उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी पाचही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (शुक्रवार, ४ आॅक्टोबरपर्यंत) अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांत १०७ उमेदवारांचे १५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी पाचही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये होणार आहे.जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वाटप व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गत २७ सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवार, ४ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ आॅक्टोबरपर्यंत) जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत १०७ उमेदवारांनी १५८ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये दाखल केले. विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून पाचही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये होणार आहे.

अकोला पश्चिम मतदारसंघ - साजीद खान मन्नान खान (काँग्रेस), मदन भरगड (वंचित बहुजन आघाडी), नकीरखा अहमदखा (एआयएमआयएम), डॉ. धनंजय नालट (बसपा), शक्तिदास खरारे (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. अशोक ओळंबे (अपक्ष), राहुल जाधव (अपक्ष), रोहित तिवारी (अपक्ष), जनार्दन कानडे (राष्ट्रीय संत संदेश), संतोष इंगळे (बहुजन विकास आघाडी).

अकोला पूर्व मतदारसंघ : हरिदास भदे (वंचित बहुजन आघाडी), विवेक पारसकर (काँग्रेस),अनिल कपले (अपक्ष), अजाबराव ताले (अपक्ष),भानुदास कांबळे (अपक्ष), संजय आठवले (अपक्ष), शेषराव खडसे (बसपा), प्रफुल्ल भारसाकळे (संभाजी ब्रिगेड), अशोक कोलटक्के (अपक्ष), दीपक तेलगोटे (अपक्ष).

अकोट विधानसभा मतदारसंघ- वामन बलदेव सरकटे (बहुजन समाज पार्टी), प्रमोद रामचंद्र खंडारे (अपक्ष), शोभा मनोहर शेळके (अपक्ष), संतोष सूर्यभान देऊळकार (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया डेमोक्रॅटिक), अनिल माणिकराव गावंडे (अपक्ष), संतोष वसंत रहाटे (वंचित बहुजन आघाडी), गजानन शांताराम तायडे (महाराष्ट्र परिवर्तन सेना टी), रामकृष्ण लक्ष्मण ढिगर (बहुजन मुक्ती पार्टी), जितेंद्र बसवंतराव साबळे (अपक्ष), शेख निसार शेख गुलाब (अपक्ष), अमोल मोतीराम व्यवहारे (विदर्र्भ माझा पार्टी), अब्दुल खालीक अब्दुल कादर (अपक्ष), केशव कृष्णराव बिलबिले (अपक्ष), संतोष श्रीकृष्ण हुशे (वंचित बहुजन आघाडी).

बाळापूर विधानसभा मतदारसंघ- संग्राम गुलाबराव गावंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), धैर्यवर्धन हरिभाऊ पुंडकर (वंचित बहुजन आघाडी), चंद्रशेखर दौलतराव चिंचोळकर (काँग्रेस), ब्रम्हदेव तुळशीराम इंगळे (अपक्ष), नारायणराव हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष), दिनकर सूर्यभान रणबावळे (महाराष्ट्र परिवर्तन सेना), बळीराम भगवान सिरस्कार (अपक्ष), मुशरीफ अहेमद गुलाम अहमद (अपक्ष), संदीप दादाराव पाटील (अपक्ष), संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), डॉ. रहेमान खान (एमआयएम), तुकाराम उकर्डा दुधे (स्वाभिमानी पक्ष), रईस अहमद शेख नूर (अपक्ष), सुनीता सुधाकर वानखडे (पीपल पार्टी आॅफ इंडिया डेमोक्रॅटिक), सविता सिद्धार्थ धाडसे (अपक्ष).

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ- हरीश मारोतीआप्पा पिंपळे (भाजप), प्रतिभा प्रभाकर अवचार (वंचित बहुजन आघाडी), राजकुमार नारायण नाचणे (प्रहार जनशक्ती पक्ष), सुरेश नामदेवराव गोपकर (अपक्ष), बाबुलाल आकाराम इंगळे (अपक्ष), धनराज रामचंद्र खिराडे (अपक्ष), पांडुरंग मोरोपंत इंगळे (बहुजन विकास आघाडी), तुषार आनंदराव दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), गौतम नामदेव कंकाळ (महाराष्ट्र परिवर्तन सेना टी), दयाराम घोडे (अपक्ष), महादेव बापुराव गवळे (अपक्ष), मेवालाल शिवचरण देवीकर (अपक्ष), रामेश्वर श्रीराम जामनीकर (अपक्ष), रवी नागोराव मेश्राम (बहुजन समाज पार्टी), सम्राट जयराम डोंगरदिवे (वंचित बहुजन आघाडी), शरद नामदेवराव गवई (वंचित बहुजन आघाडी), बळीराम गोंडुजी इंगळे (अपक्ष), राजेश तुळशीराम खडे (अपक्ष), रवीकुमार रमेशचंद्र राठी (अपक्ष).

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019