शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूक; अकोट मतदारसंघात स्थानिक उमेदवाराच्या मागणीला जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:53 IST

अकोट मतदारसंघात दिलेल्या आमदाराने काहीच केले नसल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.

अकोट : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अकोट विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी ९ आॅगस्ट रोजी झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत करण्यात आली.अकोट मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, या मागणीकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शुक्रवारी दुपारी पार पडली. या बैठकीत अनेकांनी विचार मांडताना, कार्यकर्ते पक्षाला काहीच मागत नाहीत, पक्षाने दिलेला उमेदवार निवडून देतो. भाजपात कार्यकर्ताच मोठा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात; पण पक्षाने अकोट मतदारसंघात दिलेल्या आमदाराने काहीच केले नसल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. स्थानिक उमेदवार असला तर आपुलकी, प्रेम राहते. आपण हक्काने बोलू शकतो. भाजपा शासन खूप निधी देते; मात्र बाहेरचा उमेदवार विकासाबाबत अनुकूल दिसत नसल्याचे कार्यकर्त्यांनी बैठकीत सांगितले. अकोट मतदारसंघात भाजपाकडे एकही उमेदवार नाही, असे वरिष्ठापर्यंत पोहोचविले जात आहे; परंतु या मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असणारे अनेक नेते आहेत. त्यामुळेच यावेळी स्थानिक नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बुथ प्रमुख, कार्यकर्ता यांच्या बैठकीत एक निवेदन तयार करण्यात आले. सदर निवेदन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्याचे ठरले. या निवेदनात स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्यासह इतर मागण्या करण्यात येणार आहेत. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019akot-acअकोटBJPभाजपाPrakash Bharsakaleप्रकाश भारसाकळे