शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019: युतीधर्म सांभाळण्याची कसरत; खासदारांची प्रतिष्ठा पणाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:28 IST

युतीधर्म सांभाळण्यात विजयश्री खेचून आणण्यासाठी खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

- राजेश शेगोकारअकोला: पश्चिम वºहाडातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ चार मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेनेला २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळविता आला नाही; मात्र लोकसभा निवडणुकीत तीनही खासदार विजयी करून महायुतीने पश्चिम वºहाडावर आपल्या वर्चस्वाचा झेंडा गाडला आहे. या पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणुकीत शतप्रतिशत यश, असे उद्दिष्ट समोर ठेवून महायुती कामाला लागली असून, युतीधर्म सांभाळण्यात विजयश्री खेचून आणण्यासाठी खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावतील अन् मग खऱ्या अर्थाने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू होईल. यामध्ये खासदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वाशिमच्या खासदार भावना गवळी या सलग पाचव्यांदा विजयी झाल्या असून, असा विक्रम करणाºया त्या पहिल्या महिला खासदार आहेत, तर प्रतापराव जाधव यांनी हॅट्ट्रिक करून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. हे तीनही खासदार लोकनेते व राजकीयदृष्ट्या ‘हेवीवेट’ आहेत. त्यामुळे आपापल्या कार्यक्षेत्रात शतप्रतिशत विजयाचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

लक्षवेधी लढतीवाशिम: जिल्ह्यात तीन मतदारसंघ असून, त्यापैकी कारंजा, वाशिम भाजपकडे तर रिसोड शिवसेनेला देण्यात आला आहे. वाशिममध्ये भाजप उमेदवार लखन मलिक यांच्याविरोधात शिवसेनेच्या शशिकांत पेंढारकर यांनी बंडखोरी केली असून, त्यांच्या प्रचारात सेनेचे जिल्हाप्रमुखच रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सेनेच्या खासदार म्हणून भावना गवळी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.बुलडाण्यात सेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पक्षांतर्गत विरोधकांनाही जागा दाखवून आपले एक हाती नेतृत्व प्रस्थापित केले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर युतीमध्ये जिल्ह्यात जाधव व आ. डॉ. संजय कुटे या दोन नेत्यांचाच शब्द अंतिम समजला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी बुलडाण्यात संजय गायकवाड यांच्या रूपाने शिवसेनेचा नवा चेहरा रिंगणात उतरविला आहे. येथे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ‘वंचित’ची धरलेली कास अन् भाजपचे नेते योगेंद्र गोडे यांनी अपक्ष उभे राहत केलेली बंडखारी असे पक्षांतर्गतच आव्हान सेनेसमोर आहे. त्यामुळे बुलडाण्याची जागा खा. जाधव यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. येथे काँग्रेसचे ‘हेवीवेट’ उमेदवार हर्षवर्धन सपकाळ रिंगणात असल्याने चौरंगी लढतीत युतीधर्म सांभाळून मतविभाजन टाळण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.अकोल्यातील पाचपैकी चार मतदारसंघांत २०१४ च्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या अकोल्यातील बाळापूरमध्ये शिवसेनेचे नितीन देशमुख रिंगणात आहेत. या मतदारसंघात गतवेळीही युतीधर्म अडचणीत होता, यंदाही परिस्थिती तीच असली तरी उघड बंडखोरी नाही. त्यामुळे सुप्त नाराजी आहे. मूर्तिजापुरात तर विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्याविरोधात सेनेने उघडपणे नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये बंडखोरी करीत या पक्षाचे पदाधिकारी राजकुमार नाचणे यांनी ‘प्रहार’चा झेंडा हाती घेतला. खुद्द आमदार पिंपळे यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात बेताल वक्त व्य करून पक्षालाच अडचणीत आणले आहे. अकोट मतदारसंघात शिवसेनेत झालेली बंडखोरी हे आव्हान मोडून काढण्यासाठी ना. धोत्रे यांच्यासमोर पेच आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Dhotreसंजय धोत्रेPrataprao Jadhavप्रतावराव जाधव