शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
4
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
5
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
6
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
7
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
8
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
9
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
10
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
11
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
12
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
13
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
14
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
15
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
16
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
17
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
18
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
19
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
20
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019: प्रचार संपला; तिरंगी लढतीचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 12:12 IST

आता मतदानापर्यंत मुक प्रचार सुरू राहणार असून, १८ लाखांवर मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अखेर शनिवारी संध्याकाळी संपली. प्रत्येक उमेदवाराने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रॅली, पदयात्रा, गावभेटी व कॉर्नर सभांवर जोर दिला.भाजप-शिवसेनेच्या महायुतीने प्रचारात मोदी सरकारच्या यशोगाथा, कलम ३७० आणि विकास योजनांवर भर दिला, तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने मोदी व फडणवीस सरकारच्या अपयशाचे पाढे मतदारांसमोर वाचले. यावेळी प्रचारात आक्रमकपणा दिसून आला नाही, तर मतदारांच्या गाठीभेठी व कॉर्नर मीटिंगवर सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात भर दिला. निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेठीसाठी तारांबळ उडाली होती.आता मतदानापर्यंत मुक प्रचार सुरू राहणार असून, १८ लाखांवर मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शनिवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी राजकारण मात्र चांगलेच तापलेले होते.सर्वच मतदारसंघांत चुरशीची लढतअकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिंगणात असून, भाजपचे गोवर्धन शर्मा, काँग्रेसचे साजीद खान पठाण व वंचित बहुजन आघाडीचे मदन भरगड यांच्यामध्ये तुल्यबळ अशी लढत होत आहे. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर, वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे या आजी-माजी आमदारांसह काँग्रेसचे विवेक पारसकर यांच्यामध्ये स्पर्धा आहे. बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक चुरस आहे. येथे राष्टÑवादी काँग्रेसचे संग्राम गावंडे, शिवसेनेचे नितीन देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व एमआएमचे डॉ. रहेमान खान यांच्यामध्ये चौरंगी सामना रंगला आहे. येथे मतविभाजन हा कळीचा मुद्दा आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे, राष्टÑवादी काँग्रेसचे रविकुमार राठी, वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार व प्रहारचे राजकुमार नाचणे यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. अकोट मतदारसंघात भाजपचे प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे प्रा. संजय बोडखे, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. संतोष रहाटे व अपक्ष अनिल गावंडे, प्रहारचे तुषार पुंडकर यांच्यामध्ये चुरस आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019