लाखो भाविकांनी घेतला महाप्रसाद
By Admin | Updated: January 13, 2015 01:00 IST2015-01-13T01:00:26+5:302015-01-13T01:00:26+5:30
हिवराआश्रम येथे विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता.
लाखो भाविकांनी घेतला महाप्रसाद
हिवराआश्रम (मेहकर, जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील विवेकानंद आश्रमात सुरु असलेल्या विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता चिखली मेहकर रोडवरील भव्य अशा ४0 एकराच्या शेतात पुरी भाजीच्या महाप्रसाद वितरणाने करण्यात आली. यावेळी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादासाचे पूजन हभप अशोक महाराज जाधव यांच्या हस्ते करुन पुर्ण महाप्रसाद ट्रॅक्टरमध्ये भरण्यात आला. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय, प.पु.शुकदास महाराज की जय, अशा जयघोषाने महाप्रसादाने भरलेले १00 ट्रॅक्टर विवेकानंद क्रीडांगणापासून महाप्रसादाचे ठिकाणापर्यंत नेण्यात आले. त्यानंतर ४0 एकराच्या शेतात सुमारे ८0 रांगांमध्ये दुतर्फा बसलेल्या भक्तांना पाणी पाऊचसह महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हभप गजानन पवार शास्त्री व पंढरीनाथ शेळके यांनी केले.