‘महाआॅनलाइन’मध्ये बिघाड; सातबारा वितरणाची प्रक्रिया थांबली
By Admin | Updated: April 26, 2017 19:27 IST2017-04-26T19:27:42+5:302017-04-26T19:27:42+5:30
व्याळा- जिल्ह्यातील २१० महा ई-सेवा केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली असून कॅशलेससाठी महाआॅनलाइनने पुरविलेल्या पॉश मशीनही पैसे खाणारी मशीन ठरत असल्याने केंद्र चालकांच्या भोवती अडचण निर्माण झाली आहे.

‘महाआॅनलाइन’मध्ये बिघाड; सातबारा वितरणाची प्रक्रिया थांबली
व्याळा : जिल्ह्यात सातबारा, आठ अ सह विविध शासकीय प्रमाणपत्र सेवा देणारी महा आॅनलाइनमध्ये गेल्या आठवड्यापासून तांत्रिक बिघाड झाल्याने जनतेसह जिल्ह्यातील २१० महा ई-सेवा केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली असून कॅशलेससाठी महाआॅनलाइनने पुरविलेल्या पॉश मशीनही पैसे खाणारी मशीन ठरत असल्याने केंद्र चालकांच्या भोवती अडचण निर्माण झाली आहे.
सध्या पीककर्ज वाटप सुरू झाले असून त्यासाठी लागणारे ७/१२, आठ अ मिळणे दुरापास्त झाले तर शैक्षणिक कामासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करणे विविध प्रमाणपत्र मिळविणे व विविध विभागाच्या आॅनलाइन सेव घेण्यासाठी महा काम करीत असते. मात्र गेल्या आठ दिवसापासून धिम्या गतीने चालू आहे तर २५ एप्रिलपासून पूर्णत: खंडितच झाली आहे. त्याच पॉस मशीन देऊन ते सेवाही आवश्यक ठरविली. मात्र, ती सेवा केवळ पैसे हडप करणारी ठरली आहे. त्यामुळे एटीएम धारकाचे केवळ पैसे कटतात. मात्र, सर्व्हिस जनरेट होत नाही. याबाबत महाआॅनलाईनला कित्येक मेल केले. मात्र, कुणीही उत्तर द्यायला तयार नाही तर फोनसुद्धा उचलायला तयार नाही. त्यामुळे महा ई सेवाकेंद्रासाठी डोकेदुखी ठरले आहे तर जनतेला सर्व्हिस मिळत नसल्याने जनतेनेही रोष व्यक्त केला आहे.
महाआॅनलाइनच्या तांत्रिक बिघाडामुळे कामे तर ठप्पच झाली. मात्र, जनतेचा रोषही पत्कारावा लागत आहे. यासाठी महाआॅनलाइन काहीही प्रतिसाद देत नाही.
- नितीन देशमुख, केंद्रचालक, महा ई-सेवा