महालक्ष्मी सेवा समितीने घेतली भजन गायक अनुप जलोटा यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST2021-02-09T04:21:24+5:302021-02-09T04:21:24+5:30

अकोला येथील डाबकी येथे भव्य दिव्य माता महालक्ष्मी, श्री गणपती आणि माता सरस्वती मंदिराचे काम सुरू झाले ...

Mahalakshmi Seva Samiti met Bhajan singer Anup Jalota | महालक्ष्मी सेवा समितीने घेतली भजन गायक अनुप जलोटा यांची भेट

महालक्ष्मी सेवा समितीने घेतली भजन गायक अनुप जलोटा यांची भेट

अकोला येथील डाबकी येथे भव्य दिव्य माता महालक्ष्मी, श्री गणपती आणि माता सरस्वती मंदिराचे काम सुरू झाले आहे. सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांच्या मार्गदर्शनाखाली राम पांडे, गायिका माधुरी जोशी व तबलावादक आदित्य पांडे श्री गणेश, माता महालक्ष्मी व आई सरस्वती यांच्या आरती भजन व भक्तिगीतांची ऑडिओ, व्हिडिओ कॅसेट तयार करणार आहेत. त्याकरिता अनुप जलोटा यांच्या मुंबई येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. पद्मश्री अनुप जलोटा हे सुप्रसिद्ध कॉमेडी शोचे कपिल शर्मा यांना लवकरच अकोला येथे घेऊन येणार आहेत. यावेळी महालक्ष्मी सेवा समितीचे समीर अयाचित महाराज, सुवर्णा अलोणे, मुकेश गुप्ता, श्यामसुंदर जोशी, अनुराधा जोशी, गायिका अनिता खंडेलवाल, निताशा अग्रवाल यांची उपस्थिती होती.

फोटो:

Web Title: Mahalakshmi Seva Samiti met Bhajan singer Anup Jalota