महाबीज ‘एमडी’पदाचा प्रभार विभागीय आयुक्तांकडे
By Admin | Updated: September 2, 2014 20:17 IST2014-09-02T20:17:55+5:302014-09-02T20:17:55+5:30
महाबीज व्यवस्थापकीय संचालकपदाचा (एमडी) प्रभार अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडे

महाबीज ‘एमडी’पदाचा प्रभार विभागीय आयुक्तांकडे
अकोला : महाबीज व्यवस्थापकीय संचालकपदाचा (एमडी) प्रभार अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त राजुरकर यांनी रविवारी सायंकाळी 'एमडी' पदाचा प्रभार स्वीकारला. सोमवारी त्यांनी महाबीजच्या अधिकार्यांची आढावा बैठक घेतली.
अकोल्यातील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सेवानवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या महाबीज 'एमडी' पदावर मात्र शासनामार्फत अद्याप कोण्याही अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली नाही.
या पृष्ठभूमीवर शासनाच्या आदेशानुसार महाबीज 'एमडी' पदाचा अतिरिक्त प्रभार अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडे देण्यात आला आहे.