गाेरव्हा येथे विद्यार्थ्यांना माेफत शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST2021-01-13T04:48:10+5:302021-01-13T04:48:10+5:30
विझाेरा: बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत गाेरव्हा येथे भारतीय जैन संघटनेच्या पुढाकार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना माेफत शिक्षणाचे धडे ...

गाेरव्हा येथे विद्यार्थ्यांना माेफत शिक्षणाचे धडे
विझाेरा: बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत गाेरव्हा येथे भारतीय जैन संघटनेच्या पुढाकार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना माेफत शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. सहयाेगी शिक्षण अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमाचे परिसरात काैतुक हाेत आहे.
दरराेज गावातील जवळपास १०० ते १२५ विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षणाचे धडे दिो जात आहेत. गावातील काेणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी गावामध्ये पाच समाजमंदिरांत वर्ग चालविण्यात येत आहेत. यासाठी १५ जणांची शिक्षण सारथी म्हणून निवड करण्यात आली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ग चालविण्यात येत आहे. राेजच विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभत असून चांगला प्रतिसाद लाभत आहे. या सहयाेगी शिक्षण अभियानाचा शुभारंभ प्रा. सुभाष गादिया यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावचे सरपंच राजेश पाटील-खांबलकर, रामेश्वर खांबलकर उपस्थित हाेते.
.
.............बाॅक्स..........
हे आहेत शिक्षण सारथी
प्रणव खांबलकर, वैष्ववी खांबलकर, अंजली खांबलकर, जय डाेंगरे, राेशनी भातकुले, सागर डाेंगरे, चेतन खांबलकर, संताेषी घासले, दिव्या घासले, आदित्य खांबलकर, सागर जनाप, मयूरी खाबलकर आदींची शिक्षण सारथी म्हणून निवड केली आहे.