मातृशक्तीला ‘लोकमत’चे नमन

By Admin | Updated: May 12, 2014 00:30 IST2014-05-12T00:24:28+5:302014-05-12T00:30:12+5:30

सखी मंचचा मातृत्व दिनी आगळावेगळा उपक्रम

Maatushakti 'bowing down to Lokmat' | मातृशक्तीला ‘लोकमत’चे नमन

मातृशक्तीला ‘लोकमत’चे नमन

अकोला - लोकमत सखी मंचतर्फे रविवारी मातृदिनी मातृशक्तीला नमन करत अकोला शहरातील काही प्रतिष्ठित मुलांच्या आईंचा सत्कार सोहळा लोकमत शहर कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. यावेळी आई आणि तिच्या मुलांनी अनुभव कथन केले. सर्वप्रथम आदरणीय ज्योत्स्नाताई दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित आईंच्या हस्ते करण्यात आले. डॉ. अनुप राठी यांनी त्यांच्या आई डॉ. सरोज राठी यांच्यावतीने उपस्थितांसोबत संवाद साधला. आपल्या ९0 वर्षांच्या आईसोबत आलेले सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध खरे यांनीउपस्थित मातांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. संगीताचा वारसा आई नीला खरे यांच्याकडून मिळाला असून, प्रत्येक भूमिकेत आई आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. सुनीता जैस्वाल व त्यांची मुलगी शेफाली यांची संघर्ष कथा ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. शेफाल आज एका नामांकित बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आहे. तिची आई तिला स्वत: व्हीलचेअरवर सगळीकडे नेत असून, सतत तिचा आत्मविश्‍वास वाढवते. शेफाली ४ वर्षांची असतानापासून तिला चालता येत नसल्याने आईला सतत तिच्यासोबत राहावे लागत होते. प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत त्यांनी पुढे मार्गक्रमण केले. सिद्धार्थ उके याला दृष्टी नसतानाही कुठलीच अडचण त्याचा मार्ग रोखू शकली नाही; हे फक्त आई विश्रांती यांच्या सहकार्याने झाल्याचे तो अभिमानाने सांगतो. त्याची आई आज १७ घरांमध्ये धुणीभांडी करत असते. हॉटेल व्यवसाय सांभाळणारी परी गोयनका यांनीसुद्धा आपल्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त केली. आई पद्मा यांच्यामुळेच जीवनात यशस्वी होता आल्याची भावना व्यक्त केली. डॉ. नीलिमा राऊत यांनीसुद्धा अत्यंत मार्मिक शब्दात विचार मांडले. दोन मुले असतानासुद्धा इतर दोन अनाथ मुलींचा सांभाळ त्याआजही स्वत:च्या मुलीसारखा करतात. त्यांनी आपल्या कृतीतून समाजापुढे एक आदर्श स्थापित केला आहे. डॉ. दीपा पिसे हिने आई डॉ. जयश्री यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, वडील नसतानाही आईनेच परिस्थितींना खंबीरपणे तोंड देत आम्हाला स्वत:च्या पायावर उभे केले. एवढेच नाही तर आमच्यात आत्मविश्‍वासही निर्माण केला. तसेच प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगणा राधिका साठे यांच्या नृत्याचा वारसा चालविणारी इशानी साठे हीनेसुद्धा आईप्रति कृतज्ञता व्यक्त केली. आज मी जी काही आहे ती फक्त आईमुळेच, असेही ती म्हणाली. रजनी राजगुरू, अंजली जोशी यांनीसुद्धा आपले मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखी मंच संयोजिका मीनाक्षी फिरके यांनी केले.

 

Web Title: Maatushakti 'bowing down to Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.