पाच वर्षात सर्वात कमी पाऊस
By Admin | Updated: August 6, 2014 00:17 IST2014-08-05T23:11:49+5:302014-08-06T00:17:35+5:30
नदी नाले कोरडे

पाच वर्षात सर्वात कमी पाऊस
मानोरा: जुन महिन्यात तुडूंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकत्पात ३0 टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जून महिन्यात ओव्हरर फ्लो होवून ओसंडून वाहत होते. उशिरा आलेल्या पावसाने समाधान असले तरी जलसाठयाची स्थिती मात्र अद्यापही गंभीर आहे.
मानोरा तालुक्यात दिड महिन्याच्या खंडानंतर १0 जुलै पासून पावसाची रिमझीम सुरु आहे. पावसाच्या चार महिन्यातील दिवसापैकी तालुक्यात सरासरी १५ दिवस कालावधी कोरडा गेला आहे. यातही पडलेल्या पाऊस पर्जन्य मानावर मध्ये नोंदला गेला असला तरी हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळल्यामुळे केवळ आजच्या तारखेपर्यंत १00 मि.मी. एवढा पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्या पाच वर्षात वार्षिक सरासरी ओलांडली नाही. असे झाले नाही तालुक्यातील सिंचन शाखेचे १५ धरण असून आज रोजी असलेला जलसाठा बोरव्हा ९.२१ टक्के, रतनवाडी ४४.५८ टक्के, फुलउमरी ८.३४, रुई निरंक, कार्ली निरंक, वाटोद ३.८८ टक्के, वाईगौह निरंक, पंचाळा निरंक, चिखली ३ टक्के, गिरोली १५ टक्के, आसोला १८ टक्के, टामदरी २३ टक्के, आसोला गव्हा ९ टक्के, गीद २५ टक्क्े, भिलडोंगर २९ टक्के, गेल्या पाच वर्षाची पावसाची आकडेवारीचा विचार केल्यास २0१0 मध्ये १६ जून रोजी पावसाला सुरुवात झाली होती. २0११ मध्ये १४ जुनला पावसाला सुरुवात होवून २६ जून पर्यंत १0९ मि.मी. पाऊस झाला होता. २0१२ मध्ये १0 जून रोजी मृगाचा पाऊस बरसला. १८ जून १८८ मि.मी. पावसाची नोंद झाली. २0१३ मध्ये ६ जून रोजी मृगाचा पाऊस झाला होता. १४ जून रोजी सर्वच प्रकल्प ओव्हर फ्लो झाले होते. ३0 जुलै पर्यंत १२४५ मि.मि. पाऊस झाला होता. यावर्षी ३0 जूलै पर्यंत १00 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.
पाच वर्षात प्रथमच जुलै महिना संपत आला असतांना पावसाने शंभरी गाठली नाही. दरम्यान चार वर्षात वरुण राजाने कधीही नाराज केले नाही. विशेष म्हणजे चार वर्षात मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पाऊस आला होता. १४ जून रोजी सर्व धरणे ओव्हल फ्लो झाले होते. गतवर्षी पावसाच्या पहिल्या आठवडयात नदी नाले ओढे एक झाले होते. यंदा गतवर्षीच्या उलट स्थिती आहे. पावसाच्या आगमनासाठी प्रार्थना करावी लागली. यंदा लांबलेल्या पावसाने शेतकर्यांसह सर्वांचेच गणित बिघडलेले आहे.