बारावीत कमी गुण; विद्यार्थ्याची आत्महत्या

By Admin | Updated: May 31, 2017 01:55 IST2017-05-31T01:55:30+5:302017-05-31T01:55:30+5:30

माना/ कुरूम: बारावीच्या परीक्षेत कमी टक्के गुण मिळाल्याने १९ वर्षीय विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० मे रोजी दुपारी माना येथे घडली.

Low marks in twelve; Student's Suicide | बारावीत कमी गुण; विद्यार्थ्याची आत्महत्या

बारावीत कमी गुण; विद्यार्थ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
माना/ कुरूम: बारावीच्या परीक्षेत कमी टक्के गुण मिळाल्याने १९ वर्षीय विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० मे रोजी दुपारी माना येथे घडली.
मुंबई येथील पवन शरद गवई याने इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. त्याने मामाच्या गावाला या परीक्षेचा निकाल पाहल्यानंतर त्याला ४५ टक्के गुण मिळाल्याचे पाहताच त्याने आपल्या आईचा हात सोडून पळ काढला. तो सरळ रेल्वे रुळावर गेला. समोरून रेल्वे येत असल्याने त्या खाली सापडून त्याचा मृत्यू झाला. त्याला इयत्ता बारावीच्या परीक्षेत ४५ टक्के गुण मिळाले आहेत. गुण कमी मिळाल्याने नैराश्येतून या युवकाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी रेल्वे गँगमन अजय निकम यांच्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास माना पोलीस करीत आहेत.

Web Title: Low marks in twelve; Student's Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.