अडत्याचे एक लाख रुपये हरवले
By Admin | Updated: April 17, 2015 01:55 IST2015-04-17T01:55:20+5:302015-04-17T01:55:20+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत्याचे एक लाख रुपयांची रोकड हरवली.

अडत्याचे एक लाख रुपये हरवले
अकोला: कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत्याचे एक लाख रुपयांची रोकड कोठडी बाजार ते दगडीपूलदरम्यान गुरुवारी दुपारी हरवल्याची घटना घडली. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते राजेश कन्हैयालाल चांडक (४९) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे विश्वासू रमेश शर्मा यांचेजवळ रकमेचा धनादेश देऊन त्याला बँकेतून रोख काढून आणण्यास सांगितले. शर्मा यांनी रोख काढून आणल्यावर रोखपैकी १ लाख रुपयांची रोख कोठडी बाजार ते दगडीपूल रस्त्यावर पडली. चांडक यांच्या तक्रारीनुसार, कोतवाली पोलिसांनी नोंद केली.