वीज वितरण हानीत लक्षणीय घट
By Admin | Updated: October 18, 2014 23:41 IST2014-10-18T23:41:54+5:302014-10-18T23:41:54+5:30
प्रभावी उपाययोजनांमुळे गळती ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर!

वीज वितरण हानीत लक्षणीय घट
काही तासांची प्रतीक्षा : कुणाच्या गळ्यात पडणार आमदारकीची माळ
वर्धा : मतदान झाल्यानंतर कोण निवडून येणार याची भाकिते वर्तविली जाऊ लागली. मतांची गणिते जुळविली गेली. मतदार राजाचा कौल प्रत्येकाकडून आपापल्यापरीने वर्तविण्याचा खटाटोप गत काही दिवसांपासून सुरू आहे. मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला? सारी भाकिते खोटी ठरतील काय, हे आता काही तासांनीच कळणार आहे. याची उत्सुकता आता खऱ्या अर्थाने शिगेला पोहचली आहे.
रविवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होत आहे. वर्धा व देवळी मतदार संघाची मतमोजणी वर्धेत तर आर्वी व हिंगणघाट मतदार संघाची त्या-त्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
वर्धा विधानसभा मतदार संघात एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख, भाजपाचे डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, शिवसेनेचे रविकांत बालपांडे, बसपाचे नीरज गुजर ही दिग्गज मंडळी आपले राजकीय भवितव्य आजमावत होते. यासोबत बहुजन मुक्ती पार्टीचे किशोर किणकर, शेकाप स्कर्मिश खडसे यांच्यासह अन्य राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. खरी लढत प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांमध्येच लढतीचे एकंदर चित्र आहे. मात्र कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडते, हे रविवारीच कळणार आहे. वर्धेत बहुरंगी लढतीचे चित्र असल्यामुळे उत्सुकता शिगेला पाहोचली आहे.
देवळी मतदार संघात १९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहेत. यामध्ये काँग्रेसचे विद्यमान माजी मंत्री रणजित कांबळे, भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे, या दोन दिग्गजांमध्येच ही लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशांक घोडमारे, बसपाचे उमेश म्हैसकर, शिवसेनेचे नीलेश गुल्हाने ही मंडळीदेखील रिंगणात होती. मतदार राजा रणजित कांबळे यांना चौथ्यांदा विधानसभेवर पाठविते वा माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पहिल्यांदा पाठविते. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
हिंगणघाट मतदार संघात १४ उमेदवार आपली राजकीय शक्ती पणाला लावून होते. यामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक शिंदे, राष्ट्रवादी कडून माजी आमदार राजू तिमांडे, भाजपाकडून समीर कुणावार, काँग्रेसकडून उषाकिरण थुटे, बसपाचे प्रलय तेलंग, मनसेचे अतुल वांदिले ही दिग्गज मंडळी रिंगणात होती. यापैकी कोण नवा आमदार होईल, याची जनतेला उत्सुकता आहे.
आर्वी मतदार संघात काँग्रेसकडून माजी आमदार अमर काळे आणि भाजपकडून विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्यात कडवी झुंज बघायला मिळाली. या झुंजीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप काळे, प्रहारचे बाळा जगताप आणि शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी चुरस निर्माण केल्यामुळे मतदार राजा कुणाचे गणित बिघडवेल याची उत्सुकता लागली आहे. अमर काळे यांना संधी द्यायची वा दादाराव केचे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवायचा हे मतमोजणी नंतरच कळणार आहे. चारही मतदार संघात मतदारराजाचा कौल कुणाला याचे रहस्य उलगडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)